शेतातील सोयाबीन काढतांना थ्रेशर यंत्रात दबून एका मजुरांचा मृत्यू

0
685

शेतातील सोयाबीन काढतांना थ्रेशर यंत्रात दबून एका मजुरांचा मृत्यू

 

यवतमाळ, मनोज नवले
शेतातील सोयाबीन काढतांना थ्रेशर यंत्रात जाऊन एका मजुराचा करूण दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार 30 ऑक्टोबर ला दुपारी 3 वाजता दरम्यान खडकी (गणेशपूर) शेत शिवारात घडली.

खडकी (गणेशपूर) येथील ठावरी नामक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन काढण्याकरिता आज दुपारी ट्रॅकटरसह थ्रेशर आणण्यात आले होते. थ्रेशरवर सोयाबीन काढणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मजूर कामाला होते. दरम्यान सोयाबीन काढतांना मजूर विलास भूदाजी तोडासे (५५) रा. भाराडी जिल्हा चंद्रपूर याचा तोल जाऊन तो थ्रेशरच्या बेल्टवर पडल्याने त्याला थ्रेशर मध्ये ओढल्या गेले त्यात त्याचा करूण दुर्दैवी अंत झाला.

घटनेची माहिती मिळताच मुकूटबन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू नवरे व पोलीस नाईक संतोष मडावी यांनी घटनास्थळ गाठून घटना पंचनामा करून आकस्मित मुत्यूची नोंद केली. शवविच्छेदन करीता झरी येथे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील गावागावांतून घटनास्थळी लोकांची गर्दी वाढत हळहळ व्यक्त केली जात आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here