माथौली ग्रामपंचायत तर्फे विद्यार्थीचा भव्यसत्कार

256

माथौली ग्रामपंचायत तर्फे विद्यार्थीचा भव्यसत्कार

घुग्घुस येथील काही अंतरावर माथोली गाव यांच्या माथोली ग्रामपंचायत यांच्या कडुन निरंजना मुरलीधर पायधन व मंगेश भोयर एम.पी.एस. सी.द्वारे घेण्यात आलेल्या उद्योग निरीक्षक या पदी निवड झाल्याबद्दल तसेच ओबीसी महीला प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ग्रामपंचायत माथोली जुगाद कैलासनगर यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित माथोली सरपंच्या सौ. ज्योतीताई सुनील माथुलकर ग्रा.प. सदस्य कुणाल जी. डोळे,माजी ग्राम पंचायत सदस्या मनीषाताई उरकुडे,माजी संरपच सुधाकर बोबडे, माजी उपसरपंच नारायण पाटील गुंजेकर, अंगणवाडी सेविका भगत मॅडम, जिल्हा परिषद शिक्षिका बनसोडे मॅडम तसेच गाव परिसरातील नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.

advt