हिंगणघाट वना नदी बंधारा बांधकामा संबंधी प्रकरण मार्गी लावा – माजी आमदार प्रा.राजू तिमांडे.

0
553

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
जिल्हा वर्धा

हिंगणघाट वना नदी बंधारा बांधकामा संबंधी प्रकरण मार्गी लावा – माजी आमदार प्रा.राजू तिमांडे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी चर्चा करून दिले निवेदन.

हिंगणघाट:-
महाराष्ट्र सुजल निर्माण अभियानांतर्गत हिंगणघाट येथील वना नदी बंधाऱ्यावर केटी वेअर बांधणे, इन्स्पेक्शन चेंबर बांधणे ११०० मि. मि. व्यासाची कनेक्टिंग मेन टाकने, पुरामुळे नदीची मातीची थड वाहून गेल्याने निर्माण झालेल्या गॅप बुजविण्याचे करिता रिटेलिंग भिंत व स्टोन पिचिंगच्या कामासाठी सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी प्रदान करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील हिंगणघाट येथे दौऱ्यानिमित्त आले असतांना या विषयावर चर्चा करून निवेदन दिले.
शासन निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग २००१ प्र. क्र ५६/पापु/२२ दि १० जुलै,२००१ तसेच शासन निर्णय नगर विकास विभाग क्र. संकीर्ण २००८/१३३८/प्र. क्र.१७१/०८/ नवी-२०,दि मार्च २००१ अन्वय विषयांकित बंधारा बांधकामास शासनाची मंजुरी प्राप्त झाली असून त्यानुसार नगरपरिषदेने बंधारा बांधकामाची कारवाई केली असून बंधारा बांधकामामध्ये काही बाबी मध्ये वाढ झाल्याने बंधाऱ्याच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे प्रकरणात नगरपालिकेने कार्यालयीन पत्र क्र नपाहिं-५२०/२०१३ दिनांक १५ जानेवारी २०१३ अन्वय मा.प्रधान सचिव ,पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडे अहवाल सादर केलेला आहे. बंधाऱ्याच्या बांधकामाची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदने मुख्य अभियंता,प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा, पुणे यांना विनंती केली असता संदर्भीय पत्र 3 अन्वय सादर तपासणी अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (गुणवत्ता परीक्षण पथक) यांनी संदर्भीय पत्र क्रमांक 4 अन्वय सादर तपासणी मुख्य अभियंता, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक यांनी सदर तपासणी अधीक्षक अभियंता, दक्षता पथक,अमरावती परिमंडळ पाटबंधारे विभाग ,अमरावती यांच्याकडून करण्याबाबत सुचविलेले आहे.
त्यानुसार सदर प्रस्ताव तपासणीकरिता प्रत्यक्ष अमरावती येथे सादर केले असता त्यांची विभागाकडून सदर कामाचे क्षेत्र वर्धा जिल्हा अंतर्गत येत असल्याने नागपूर परिमंडळ पाटबंधारे विभाग नागपूर यांच्याकडे देण्यात यावे असे सुचविले त्यामुळे सदर प्रस्ताव संबंधित विभागाकडे नागपूर येथे प्रत्यक्ष देण्यात आला. परंतु संबंधित विभागाकडून सुद्धा कामाची तपासणी या विभागाकडून करण्यात येणार नसल्याचे सांगितले.
तरी सदर प्रकरणी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसह मंत्रालयांमध्ये बैठक लावून बंधारा बांधकामाची प्रकरण मार्गी लावण्यात यावे अशी मागणी माजी आमदार प्रा राजू तिमांडे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here