सुदर्शन निमकर यांच्या जन्मदिनानिमित्त 84 रक्तदात्यांनी केले रक्तदान

0
448

सुदर्शन निमकर यांच्या जन्मदिनानिमित्त 84 रक्तदात्यांनी केले रक्तदान

 

 

राजुरा : राजुरा चे माजी आमदार भाजपा नेते सुदर्शन निमकर यांच्या जन्मदिनानिमित्त श्रीराम मंदिर राजुरा येथे सुदर्शन निमकर मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवित वाढदिवस साजरा केला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार ऍड. संजय धोटे यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील उरकुडे, हरिभाऊ झाडे, भाजपाचे राधेश्याम अडानीया, राजेंद्र डोहे, आदिवासी नेते बाबुराव मडावी, विमाशी चे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, संदीप गायकवाड, सतीश धोटे, वाघुजी गेडाम, हरजित संधू, भाऊराव चंदनखेडे, दिलीप वांढरे, विनायक देशमुख, सुरेश रागीट, महादेव तपासे, मधुकर नरड, मिलिंद देशकर, प्रशांत घरोटे, सचिन बैस, गणेश रेकलवार, सुनील लेखराणी, सचिन शेंडे, अनिल खणके, दीपक झाडे, अजय बांदुरकर, नवनाथ पिंगे, राजकुमार भोगा, मोहन कलेगुलवार, नितीन बांब्रटकर, चुनाळा सरपंच बाळनाथ वडस्कर, माजी सरपंच संजय पावडे, प्रदीप बोबडे, काशिनाथ गोरे, मनोज पावडे, उपस्थित होते.

सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते रक्तदानाचे महत्त्व जाणून आजपर्यंत शेकडो रक्तदात्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदविला. या वर्षी बहुतांश युवक आणि जेष्ठ नागरिकांनी रक्तदानात सहभाग नोंदविला आहे.

रक्तदान शिबिरात चंद्रपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुलमेथे, डॉ. अशोक जाधव, जिल्हा रक्तपेढीचे डॉ. भूषण सिरसाट, प्रयोग शाळा तंत्रज्ञ जय पचारे, शुभांगी पुरटकर, पल्लवी पवार, समाजसेवा अधीक्षक पंकज पवार, चेतन वैरागडे, रुपेश घुमे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here