तुलंगा बु येथे वॄक्षारोपन करण्यात आले

0
485

तुलंगा बु येथे वॄक्षारोपन करण्यात आले

𝙄𝙢𝙥𝙖𝙘𝙩 24 𝙣𝙚𝙬𝙨
अकोला जिल्हा प्रतिनिधी
मुकेश संतोष हातोले
९०२१६५२८४०

अकोला:महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे स्वायत्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत समता दूत प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ,वृक्षारोपण पंधरवडा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ५ जून ते २६ जून या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे त्यातीलच एक कार्यक्रम म्हणून पातुर तालुक्याचे समतादूत समता तायडे यांनी स्थानिक ग्रामपंचायत तुलांगा बुद्रुक येथील सरपंच ,उपसरपंच ,पोलीस इत्यादी गावकरी मंडळी यांच्या हस्ते स्मशान भूमी व इतर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला . कोविद-१९ चा प्रभाव वाढता प्रभाव वाढत्या प्रादुर्भावामुळे प्राणवायूची जाणवत असलेली कमतरता तसेच वाढते प्रदूषण पाहता पर्यावरणाचे रक्षण करणे महत्त्वाचे झाले आहे त्यामुळे पातूर तालुक्यातील काही गावांमद्दे समतादूत तायडे यांच्या मार्फत कडुलिंब वड पिंपळ आंबा चिंच इत्यादी मोठ्या वृक्षांचे रोपण करण्यात येत असून हे सर्व रुक्ष प्राणवायू व सावली देणारे आहेत या पूर्ण वृक्षारोपण पंधरवड्यात महाराष्ट्रात एकूण पन्नास हजारांपर्यंत रुक्ष लावण्याचा बार्टीचा मानस आहे.बार्टीचे समता दूत समता तायडे यांनी लोकसहभागातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी प्रत्येक व्यक्तीने किमान एक किंवा त्यापेक्षा जास्त वृक्ष लावावीत व त्याचे संगोपन करावे असे आव्हान समता तायडे वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत सरपंच सदक्ष्य मा. बंडुभाऊ पाटील, विलास हातोले, अरूण हातोले, प्रमोद पाटील, गजानन कचाले, पंकज हातोले, सागर हातोले, व ईत्यादी उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here