खडसंगीत भाजप प्रणीत पॅनलची एक हाती सत्ता

0
461

खडसंगीत भाजप प्रणीत पॅनलची एक हाती सत्ता

 

तालुका प्रतिनिधी
चिमूर

चिमूर तालुक्यातील चार गावातील ग्रामपंचायत च्या निवडणुका होऊ घातल्या होत्या यात जामणी ग्रामपंचायत अविरोध झाली होती तर इतर तीन ग्रामपंचायत मध्ये चुरशीच्या निवडणुका सुरू होत्या 16 ऑक्टोबर ला निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडली होती. 17 ऑक्टोबर ला 11 वाजताच्या दरम्यान चिमूर तहसील कार्यलयात तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी प्रक्रियेला सुरवात करण्यात आली होती.

खडसंगीत भाजपप्रणीत ग्रामविकास पॅनल नल उभे करण्यात आले होते. यादरम्यान खडसंगी येथे सरपंच सहित भाजप प्रणीत आठ उमेदवार विजयी झाले तर दोन उमेदवार काँग्रेस प्रणीत सुशिक्षित ग्रामविकास पॅनेल चे उमेदवार निवडून आले आहेत. सरपंच पदाचे अपक्ष उमेदवार रीना चट्टे यांनी सर्व उमेदवारांना घाम फोडीत स्वबळावर दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली हे विशेष!१२१ मतांच्या फरकाने त्यांचा प्रराभव झाला आहे.

सरपंच म्हणून सौ.प्रियांका कोलते,सदस्य म्हणून गीता वरभे,शिल्पा गेडाम, संदीप भोष्कर,सीमा वाकडे,प्रतिभा गेडाम,सुरेश सहारे,रुपचंद शास्त्रकार, मिथुन झाडे विजयी झाले.

यावेळी चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते आपल्या पोलीस पथकासहित काम सांभाळले.विजयानंतर गावातुन मिरवणूक काढण्यात आली होती ठीक ठिकाणी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.

“आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून मतदारांनी हा कल दिला आहे.हा विकास कामांचा रथ असाच सुरू राहील.विविध ठिकाणच्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.
– राजू पाटील झाडे
तालुका अध्यक्ष भाजपा,चिमूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here