बंडु धाेतरे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला विद्यमान नगर सेविका छबूताई वैरागडे यांची भेट

0
761

बंडु धाेतरे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला विद्यमान नगर सेविका छबूताई वैरागडे यांची भेट

चंद्रपूर । किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी

ब्लक गोल्ड सिटी म्हणुन अख्ख्या विदर्भात आेळख असणां-या चंद्रपूर नगरीतील एकमेव ऐतिहासिक गाेंडकालीन तसेच येथील शासक गाेंडराजांनी निर्माण केलेला रामाळा तलाव प्रदूषण मुक्त करण्यांस साेबतच खाेलीकरण व संवर्धनाच्या मागण्यांसाठी इकाे-प्राे चे या पुर्वी बैठा सत्याग्रह आंदोलन झाले. परंतु या आंदाेलनातुन उपरोक्त मागण्यांची परिपुर्तता झाली नसल्यामुळे शेवटी सोमवार दि.२२ फेब्रुवारी पासुन रामाळा तलावा जवळील परिसरात इकाे -प्राेने अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदाेलनाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळींनी आंदोलन मंडपाला भेट देवून आपला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान या आंदाेलनाला स्थानिक जटपूरा प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका तथा शहरातील उत्कृष्ट महिला मंचच्या जेष्ठ पदाधिकारी छबूताई वैरागडे, मंगला माेगरे, पुजा पडाेळे, प्रणिता पडाेळे, वैशाली नगराळे, चंदा घाेडमारे, पुनम खनके, विनया मंगरुळकर, कल्पना बड़ी यांनी भेट देवून समर्थन दिले. सामाजिक कार्यात इकाे -प्राेचे नेहमीच माेलाचे योगदान राहिलेले आहे. आज पाेवेताे शहरात या संस्थेचे कार्य काैतुकास्पद व वाखाण्याजाेगे असुन सुरु असलेल्या या आंदाेलनाचा आजचा५वा दिवस आहे. गेल्या कित्येक वर्षापासुन या तलाव संवर्धनासाठी मागणी केल्या जात आहे. या संदर्भात बैठकाही पार पडल्या परंतु प्रत्येक बैठकीत निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केल्या जात असल्यामुळे या तलावाचा प्रश्न जैसे थे आहे. उपराेक्त मागण्यां पूर्ण व्हाव्या या साठी खुद्द इकाे -प्राे संस्थाचे अध्यक्ष बंडु धाेतरे हे अन्नत्याग आंदोलन करीत आहे हे विशेष! चंद्रपूरचे प्रख्यात अधिवक्ता दत्ता हजारे यांनी सुरु असलेल्या या आंदाेलनाला भेट देवून आपला पाठिंबा दर्शविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here