संजय गांधी निराधार याेजनेपासून काेणताही लाभार्थी वंचित राहणार नाही संजय मारकवार

0
418

संजय गांधी निराधार याेजनेपासून काेणताही लाभार्थी वंचित राहणार नाही संजय मारकवार

मूल (चंद्रपूर) किरण घाटे

नियमात बसत असेल तर मूल तालुक्यातील काेणताही लाभार्थी संजय गांधी निराधार याेजने पासून वंचित राहणार नाही असे स्पष्ट मत नवनियुक्त संजय गांधी निराधार याेजनेचे अध्यक्ष ,स्थानिक मूल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तथा भूतपूर्व सभापती संजय मारकवार यांनी आज इम्पँक्ट २४चे प्रतिनिधीशी बाेलतांना व्यक्त केले.
या भागात अनेक गाेर गरीब असुन त्यांचे समस्यांची व परिस्थितीची जाण मला प्रत्यक्षात असल्याचे ते म्हणाले .संजय मारकवार यांनी शेतक-यांच्या रास्त मागण्यांसाठी याच मूल तालुक्यात अनेकदा (शेतक-यासाठी)आंदोलन छेडली असुन काँग्रेसचे ते जेष्ठ नेते आहे .आदर्श गांव म्हणुन त्यांचे राजगड या गावची अख्ख्या महाराष्ट्रभर आेळख आहे हे विशेष! दरम्यान मारकवार यांनी या नवनियुक्ती बाबत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार , खासदार बाळा धानाेरकर , व चंद्रपूर जिल्हा काे.आँ.बँकेचे अध्यक्ष संताेष रावत यांचे विशेष आभार मानले आहे .काेणाच्याही विश्वासाला मी तडा जावू देणार नाही असे बाेलतांना शेवटी ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here