महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलच्या “नव नारींचा” यंदा झाला पुरस्कार व सन्मानपत्रे देवून विशेष सन्मान !पुरस्कारात प्रामुख्याने जेष्ठ लेखिका विजया भांगे, अर्चना सुतार व स्मिता बांडगे यांचा समावेश !

0
806

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलच्या “नव नारींचा” यंदा झाला पुरस्कार व सन्मानपत्रे देवून विशेष सन्मान !पुरस्कारात प्रामुख्याने जेष्ठ लेखिका विजया भांगे, अर्चना सुतार व स्मिता बांडगे यांचा समावेश !

किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्रभर प्रसिध्दीच्या झाेतात असलेल्या नामवंत व प्रख्यात सहज सुचल समुहातील (काव्यकुंज मधील )नव नारी शक्तिंचा या वर्षात विशेष पुरस्कार व सन्मान पत्रे देवून विविध सामाजिक संस्था व सामाजिक संघटने व्दारे सन्मान झाला .या पुरस्कारात व सन्मानपत्रे प्राप्त करण्यांत अचलपूर तालुक्यातील जेष्ठ लेखिका व काव्यरचनाकार विजया भांगे , चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील स्मिता बांडगे तथा राज्यातच नव्हे तर परदेशात देखिल आपल्या यशाचा झेंडा राेवणां-या सातारा जिल्ह्यातील पाचवडच्या अर्चना सुतार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या शिवाय सामाजिक साहित्यिक व फडकी आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद विभूषित करणां-या (गडचिराेली जिल्ह्यातील मुळ रहिवाशी) कुसुम अलाम , मूलच्या न.प.चा महिला सन्मान पुरस्कार प्राप्त प्रतिमा नंदेश्वर , आनंद नगर वणी येथील साहित्य क्षेत्रातील विशेष पुरस्कार मिळविणां-या तथा या आधी शांतीदुत पुरस्कार प्राप्त केलेल्या रजनी पाेयाम ,साहित्य वर्तुळात आपल्या काव्य रचनेची वेगळी छाप उमटविणां-या व अनेक पुरस्कार विजेता मंजुषा दरवरे , निराधार ,मानसिक (रुग्ण) व अपंग यांची सदैव सेवा करणां-या व साहित्य क्षेत्रात विशेष रुची ठेवणां-या बुलठाण्यांच्या प्रा.वंदना ढवळे ,तदवतंच सहज सुचलवरील नवाेदितांसाठी प्रेरणास्थान ठरणा-या राजुरा निवासी संजीवनी धांडे यांचा प्रामुख्याने समावेश आहे .

विशेष उल्लेखनिय बाब अशी की अर्चना सुतार यांनी काेराेना संकटात १००कविता लिहुन त्याच कवितांच्या माध्यमांतुन जनजाग्रूतीचे महान व पवित्र कार्य केले आहे .सहज सुचलवरील उपरोक्त महिला साहित्यिकांचे कार्य उल्लेखनिय व माेलाचे असल्याचे सहज सुचल समुहाच्या अधिवक्ता मेघा धाेटे ,मायाताई काेसरे (काव्यकुंज)प्रभा अगडे (साे .मि.)सहसंयाेजिका कविता चाफले तथा ज्याेति मेहरकुरे यांनी आज आपल्या एका संयुक्तिक अभिनंदन संदेशात म्हटले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here