वडसी रेतीघाट लिलाव प्रकिया
रद्द करण्याची मागणी
नागरीक अधिकार संरक्षण मंचचे संयोजक नितीन पाटील यांचा आंदोलन करण्याचा इशारा
विकास खोब्रागडे
चंद्रपूर/- चिमूर तालुक्यातील वडसी येथील उमा नदी रेती घाट लिलाव प्रकिया शासन दरबारी सुरू असून या प्रकियेस ग्रामस्थांनी विरोध केला असल्यामुळे शासनाने वडसी रेतीघाट प्रकिया रद्द करण्याची मागणी नागरीक अधिकार संरक्षण मंचचे संयोजक नितीन पाटील यांनी केली असून अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी गोंदेडा पासून जवळच असलेल्या वडसी येथील उमा नदी रेती घाटाची लिलाव प्रक्रिया सुरू असून या प्रकियेस ग्रामस्थांनी विरोध केला आहे दि ५ जानेवारी २१ ला प्रशासन रेती घाट लिलाव प्रक्रिया होणार आहे रेती घाट लिलाव झाल्यास रेती उपसा केल्याने पाण्याची समस्या निर्माण होणार जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार असल्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासन प्रशासन ने दखल घेत वडसी उमा नदी रेती घाट लिलाव प्रक्रिया रद्द करण्याची मागणी नागरिक अधिकार संरक्षण मंचचे नितीन पाटील यांनी केली असून अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला .