घुग्घुस शहरातील दहा बगीच्यांची व सर्व सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करा

82

घुग्घुस शहरातील दहा बगीच्यांची व सर्व सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करा

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची मागणी

घुग्घुस शहरातील दहा बगीच्यांची व सर्व सार्वजनिक शौचालयाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी न. प. चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. घुग्घुस परिसरातील अनेक वार्डात मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून सुंदर दहा बगीच्यांची निर्मिती करण्यात आली होती. दहा बगीच्यांच्या निर्मितीला तीन वर्षाचा कालावधी लोटत आहे.

त्याठिकाणी बसविण्यात आलेले लोखंडी जीमचे साहित्य मोळकीस आले आहे. बगीचामध्ये दररोज सकाळी लहान मुले खेळण्यासाठी व जेष्ठ नागरिक व महिला व्यायाम करण्यासाठी जातात. परंतु लोखंडी साहित्य मोळकीस आल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच फुलांच्या झाडांची अवस्था ही वाईट झाली आहे त्यामुळे बगीच्यांचे सौंदर्य खराब होत आहे.

शहरातील अनेक वार्डात सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु अनेक सार्वजनिक शौचालये बंद अवस्थेत आहे. शौचालयातील सीटांना मुख्य टाकी सोबत जोडण्यात आले नाही. आधी शौचालयात पाण्याची व्यवस्था मुबलक प्रमाणात होती. परंतु आता शौचालयाची पाईप लाईन खराब झाल्याने अनेक शौचालयात पाण्याची व्यवस्था नाही. शौचालयच्या बाजूला घाण कचरा साचलेला आहे त्यामुळे महिलांना व नागरिकांना सार्वजनिक शौचालयाचा वापर करता येत नाही आहे. अनेक महिलांना उघड्यावर शौचास बसावे लागत आहे.

ही समस्या लक्षात घेत भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह न. प. कार्यालयात मुख्याधिकारी यांची भेट घेतली याबाबत चर्चा केली दरम्यान मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी भाजपाचे संजय तिवारी, संतोष नुने, साजन गोहने, सुरेंद्र जोगी, अमोल हिरादेवे, श्रीकांत डांगे उपस्थित होते.

advt