शिक्षक धावले पीडित कुटुंबियाच्या मदतीसाठी

0
556

शिक्षक धावले पीडित कुटुंबियाच्या मदतीसाठी

कोरपना प्रतिनिधी
गडचांदुर : येथील प्रभाग क्रमांक १ मधून जाणाऱ्या हाय व्होल्टेज च्या विद्युत तारांना नकळत स्पर्श होऊन नऊ महिन्यांची गर्भवती पल्लवी शुभम पेंढारकर ह्या महिलेला शॉक लागल्यामुळे आपला हात गमवावा लागला.

एकदा नव्हे तर दोन वेळा सदर महिलेला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. शस्त्रक्रियेला येणारा खर्च व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी सामजिक बांधिलकीतुन पल्लवी पेंढारकर ला अल्पशी मदत केली.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मराज काळे, पर्यवेक्षक संजय गाडगे, ज्येष्ठ शिक्षक महेंद्र ताकसांडे, प्रा. जहीर सैय्यद, लीलाधर मत्ते, सिताराम पिंपळशेंडे, गणपत आत्राम इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here