वंचित बहुजन आघाडी तर्फे नगर शाखा बेंबाळ – जुनसुर्ला जिप व पंचायत समिती सर्कल कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

0
532

वंचित बहुजन आघाडी तर्फे नगर शाखा बेंबाळ – जुनसुर्ला जिप व पंचायत समिती सर्कल कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

 

मूल, 11 फेब्रु. : आज वंचित बहुजन आघाडी नगर शाखा बेंबाळ व बेंबाळ जूनासूर्ला जिप व पंस सर्कल च्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक धीरज बांबोळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर कार्यकर्ता मेळावा बाबासाहेब आंबेडकर सभागृह (नवीन बौद्धविहार) येथे 11 वाजता आयोजित करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सत्ता आपल्या हाती घेण्यासाठी तसेच वंचित घटकांच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडी एकमेव राजकीय पर्याय असल्याचे सांगितले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा संघटिका अवंतिका उके यांच्या हस्ते बेंबाळ शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. सदर कार्यकर्ता मेळाव्यास जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कल मधील कार्यकर्ते तसेच गावातील सर्व जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here