पोदार इंटरनॅशनल स्कुल बल्लारपूर द्वारा सुर्यनमस्काराचा संकल्प आयोजित

0
624

पोदार इंटरनॅशनल स्कुल बल्लारपूर द्वारा सुर्यनमस्काराचा संकल्प आयोजित

 

12 फेब्रु. : पोदार इंटरनॅशनल स्कुल बामणी, बल्लारपूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 75 कोटी सामुहिक सुर्य नमस्काराचा उपक्रम आज राबविण्यात आला.
याप्रसंगी पोदार इंटरनॅशनल स्कुल, बामणी बल्लारपूर चे प्राचार्य डॉ. राकेश रंजन, मुख्याध्यापिका रुबिना शेख, क्रीडा शिक्षक मयूर खेरकर, शिक्षिका चैताली राव, खुशबू सूर्यवंशी, नेहा महेशकर, हबीबा खान, हर्षा डांगरे, सुखकिरन कौर, अश्वथी कस्तुरवार, मरीयम मोरपक, शितल शथपलकर तसेच संपूर्ण नर्सरी व वर्ग 1 ते 7 चे संपूर्ण विद्यार्थी उपस्थित होते.
या संकल्पाला पूर्ण देशवासियांनी सहकार्य करून पूर्णत्वास आणावे असे आवाहन प्राचार्य डॉ. राकेश रंजन, शरद करोले व प्रेम मांझी यांनी केले. संकल्प पार पडण्यास सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तसेच अविरत कार्य सुरू राहील या करिता संकल्प घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here