मॅजिक बस संस्थेच्या वतीने बालदिना निमित्य “माझी शाळा माझी सुरक्षा” उपक्रम संपन्न

0
409

मॅजिक बस संस्थेच्या वतीने बालदिना निमित्य “माझी शाळा माझी सुरक्षा” उपक्रम संपन्न

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपुर संस्थेच्या वतीने मूल तालुक्यात SCALE कार्यक्रमा अंतर्गत १२ ते १६ वयोगतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “खेळाद्वारे/जीवन कौशल्य विकास” हा कार्यक्रम मागील वर्षा पासून अविरतपणे राबविला जात आहे.
त्याच अनुषंगाने बालदिना निमित्य दिनांक १४ ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधी दरम्यान मौजा भादुर्णी, हळदी, ताडाळा, मारोडा, राजोली, मरेगाव, मोरवाही, चिरोली, सिंथाळा, सुशी, भेजगाव, बाबराळा, बेंबाळ इत्यादी गावनमध्ये “माझी शाळा माझी सुरक्षा” हा उपक्रम राबविण्यात आला. याद्वारे शाळा सुरू झाल्या नंतर शाळेकडू विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या तसेच गावातील नागरिकांच्या काय अपेक्षा असतील या विषयी चर्चासत्र घेण्यात आले, त्या सोबतच विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या.

हा संपूर्ण उपक्रम मॅजिक बस संस्थेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे व तालुका निरीक्षक मा. निकिता ठेंगणे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रनात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा साहाय्यक अधिकारी संदेश रामटेके, आकाश गेडाम, दिनेश कामतवार व शुभांगी रामगोणवार यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here