कोविड केयर सेंटरची माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी केली पहाणी.
आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्यासोबत चर्चा करून उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे ग्रँड उपलब्ध करण्याबाबत केली मागणी.

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
हिंगणघाट:- ०८ सप्टेंबर २०२०
दिवसेंन-दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाटच्या वतीने म्हाडा कॉलनीमधील क्वार्टर मध्ये “कोविड-१९ केअर सेंटर” उघडण्यात आले असून त्याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केली. व रुग्णांकडून तिथल्या व्यवस्थेबाबतची माहिती घेतली.त्यावेळी सोबत उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांचा चमू उपस्थित होते. डॉक्टरांकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला व समस्या जाणून घेतल्या.
कोविड-१९ केअर सेंटरच्या औषधीचा पुरवठा व साफसफाईसाठी सरकार तर्फे ग्रँड पाठविण्याबाबत आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सांगितले त्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही तसेच डी.वाय.एस.पी हिंगणघाट यांना इमारतीच्या देखरेखीसाठी कर्मचारी पाठविण्याबाबत सांगितले. नगरपरिषद हिंगणघाटच्या मुख्याधिकारी यांना कर्मचारी पाठवून संपूर्ण इमारतीची साफसफाई करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी सांगितले.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाची रिप रिप व ढगाळ वातावरणामुळे सर्दी, खोकला ,ताप, कफ इत्यादी आजारांचा सामना जनतेला करावा लागत आहे तरी त्यांनी सरकारी दवाखाना किंवा प्रायव्हेट दवाखान्यात जाऊन उपचार करावा.कोविडच्या आजाराला घाबरण्याचे कारण नाही उपचार केल्यास तब्येत चांगली होऊ शकते. तरी सर्व नागरिकांनी दक्ष राहून कोविडचा सामना करावा असे आव्हान माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केले आहे.