कामठीत शिवराज्याभिषेक दिन साेहळा साजरा !

0
561

कामठी नागपूर -✍🏻किरण घाटे विशेष प्रतिनिधी – : श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान कामठीच्या वतीने आज रविवार दि. ६ जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळ्या निमित्त ललकारी, महाराजांची आरती, आखाडा प्रात्यक्षिक इत्यादी द्वारे महाराजांना मानवंदना देण्यात आली. ह्याप्रसंगी प्रतिष्ठानाकडून हितेश बावनकुळे यांनी शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाबद्दल आभार मानून धन्यवाद व्यक्त केले. शिवरायांचे गुण अंगी बाळगून आधुनिक युगात महाराजांचे स्वराज्य अस्तित्वात आणण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच पंकज नालेंद्रवार, किर्ती मुरमारे, नंदिनी चौधरी आदींनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.

चंद्रशेखर तुप्पट यांनी ललकारी देऊन तर पारसे बंधू यांनी आखाड्याचे प्रात्याक्षिक सादर करून महाराजांना मानवंदना दिली.

कार्यक्रमाला अनिल देशमुख, श्रीकांत मुरमारे, राहुल शर्मा, सुमित शर्मा, तुषार पारसे, अश्विन पारसे, अनिकेत, रोहित तरारे, आयुष शेंडे आदीं उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here