अमराई तिलक नगर वॉर्डातील समस्या सोडवा : महिला काँग्रेसची मागणी
घुग्घूस : शहरातील अमराई, तिलक नगर उडीया फैल, झोपडपट्टी परिसरात नाली, पथदिवे स्वच्छता संबंधित अनेक समस्या आहेत. परिसरातील नाल्या तुटलेले अवस्थेत आहे तर अनेक ठिकाणी नाल्याच नाही. गेल्या अनेक महिन्यापासून नाल्या स्वच्छता करण्यात आली नाही. नाल्यांचा घाणेरडा पाणी घरात जात असून नागरिकांना जीवघेणा आजार होत आहे.
स्व. शेषराव ठाकरे यांच्या घर परिसरात नाली व बोरिंग उपलब्ध करून देने, बौध्द विहार परिसरात वाघमारे यांच्या घराशेजारील नाल्या स्वच्छ करण्यात यावे. तसेच पथदिवे लावण्यात यावे. संजय किराणा परिसरात नाल्या निर्माण करण्यात यावे अलीम शेख यांच्या घर परिसरात गेल्या अनेक महिण्यापासून पथदिवे बंद आहेत.
या समस्या घेऊन महिला काँग्रेसचे महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदचे नवनियुक्त मुख्याधिकारी निलेश रंजणगावकर यांना केली.
याप्रसंगी निलिमा वाघमारे, पार्वतीबाई श्रीवास्तव, छाया पासवान, इंदू बाई जाधव, तेजो बाई यादव, नंदाबाई आत्राम व अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होते.