ग्रामपंचायत निकालात काँग्रेसची बाजी : ८४ पैकी ४३ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

0
756

ग्रामपंचायत निकालात काँग्रेसची बाजी : ८४ पैकी ४३ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

 

राजुरा (ता.प्र) :- राजुरा विधानसभा क्षेत्रात राजुरा, कोरपना आणि जिवती येथे पार पडलेल्या निवडणूकीत एकुण ८४ पैकी ४३ जागेवर काँग्रेसचा झेंडा फडकविला असून क्षेत्रातील ४३ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे सरपंच आणि बहुतांश ठिकाणी सर्वाधिक सदस्य निवडून आले असून क्षेत्रातील एकुण निकालात काँग्रेसने बाजी मारली आहे.

यात राजुरा तालुक्यातील ३० पैकी काँग्रेस – १५ भाजप – ९, शे. संघटना – ३, गोंडवांना- १, शिवसेना – १, अपक्ष – १, कोरपना तालुक्यातील २५ पैकी काँग्रेस – १४, भाजप – ३, शे. संघटना – ३,अपक्ष – १, जिवती तालुक्यातील २९ पैकी काँग्रेस – १४, भाजप – ७, शे. संघटना – १,वंचित – २, राष्ट्रवादी – १, गोंडवाना – ३, भाजप + गोंडवाना – १ असे निकाल जाहीर झाले आहेत. या प्रसंगी राजुरा येथे चंद्रपूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी काँग्रेसच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

 

 

“राजुरा विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी काँग्रेसला स्पष्ट कौल दिला असून एकूण ८४ पैकी ४३ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे सरपंच निवडून आले आहेत. क्षेत्रात आपण करीत असलेल्या विकासकामाला जनतेने दिलेला हि विजयी कौल असून हा विजय काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे फलीत आहे. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि मतदार बंधुभगीनींचे मनःपुर्वक आभार.”
आमदार सुभाष धोटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here