वणीत बाप्पाच्या विसर्जनासाठी “वणी पोलिस आपल्या दारी…..”

0
490

वणीत बाप्पाच्या विसर्जनासाठी “वणी पोलिस आपल्या दारी…..”

शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करा – पोलीस निरीक्षक यांचे जनतेला आवाहन

 

 

वणी (यवतमाळ), मनोज नवले (१९ सप्टें.) : कोरोनासारख्या महाभयंकर महामारीपासून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक याचे वतीने वणी पोलिस विभागाने शहरातील गणेश विसर्जनानिमित्य बाप्पाचे विसर्जन करा घरचे घरी व पोलीस येथील आपल्या दारी या जयघोषाने बाप्पाचे विसर्जन करण्यात यावे असे आवाहन प्रशासनातर्फे केले आहे.

 

जेणेकरून शहरात गर्दी होणार नाही व कोरोना नियमाचे पालन सुद्धा करण्यात येईल या दृष्टीने वणी पोलीस विभाग शहरातून मूर्ती व निर्माल्य विसर्जन रथ फिरवणार आहे. तेव्हा ज्या नागरिकांनी घरच्या घरी विसर्जन केलेअसतील तर, पोलीस आपल्या दारी येणार असून त्यासाठी नागरिकांनी 9370137098 व 9553369657 या नंबरवर संपर्क साधून आपण विसर्जन केलेल्या बाप्पाची मूर्ती व निर्माल्य पोलीस विभागाकडून तयार करण्यात आलेल्या विसर्जन रथात देण्यात यावे.

 

वणी शहरातील नागरिक व पोलीस प्रशासन मिळून कोरोनावर मात करायचे असल्याने पोलीस विभागातर्फे विसर्जन रथ तयार करण्यात आला आहे. तेव्हा बाप्पाचे विसर्जन करणार्यांनी मूर्ती व निर्माल्य विसर्जन रथात देण्यात यावे असे आवाहन वणीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here