पळसगांव (पि) येथे अशोकविजयादशमीचा दिन उत्साहात साजरा
विकास खोब्रागडे

पळसगांव (पिपर्डा) दि. 25 आक्टोंबर । चिमूर तालुक्यातील मौजा पळसगांव (पि)येथील नालंदा बुद्ध विहाराच्या पटांगणात सायंकाळी 5 वाजता अशोक विजया दशमी चा तथा आदिवासी समाज तर्फे महात्मा राजा रावण यांची जयंती व स्वप्न पुष्प मंडळा तर्फे दसरा उत्सव सुद्धा साजरा करण्यात आला. या वेळी covid-19 चे प्रोटोकॉल पाळून उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी बौद्ध समाजाचे अध्यक्ष दामोदर रामटेके यांच्या हस्ते बुद्ध विहारा मध्ये परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अगरबती आणि मेणबत्ती प्रज्वलित करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. या वेळी बौद्ध समाजाचे सचिव प्रभाकर गजभिये,स्वप्न पुष्प मंडळचे अद्यक्ष सुभाष बन्सोड,आदिवासी समाजाचे छत्रपाल मसराम हे यावेळी उपस्थित होते.