प्रसिद्धीसाठी अहेरीचे रस्ते बुजविण्याचे ढोंग

0
553

प्रसिद्धसाठी अहेरीचे रस्ते बुजविण्याचे ढोंग

अहेरी शहरातील रस्त्याची परिस्थिती ‘जैसी की तैसी’

अहेरी (गडचिरोली) ✍️ सुखसागर झाडे
शहरातील मुख्य मार्गावरील गांधी चौक समेत बस स्थानक रोडावर ठीक ठिकाणी पावसामुळे मोठं मोठे खड्डे पडून रहदरीस नागरीकांना मोठी अडचण निर्माण झाली होती, मात्र काही संघटनेच्या व पक्षाच्या पदाधिका-यांकडून प्रसिद्धीसाठी येणाऱ्या जिल्हा परिषद व नगर पंचायत निवडणूकीचा फायदा घेण्यासाठी जनतेच्या डोळ्यात तेल टाकण्याचे काम कऱण्यात आले आहे, फक्त वृत्तपत्रात प्रसिद्ध मिळावी यासाठी तात्पुरती स्वरूपात खड्डे भुजविण्यात आले होते मात्र ते खड्डे तीन या चार दिवसात जैसे की तैसे स्थितीत निर्माण झाले आहेत. पावसाळ्या मुळे नागरीकांना या रस्त्यावरून जाण्यासाठी जीवाची कसरत करावी लागत आहे.

 

काही पक्षाचे पदाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन खड्ड्यात वरवरती गिट्टी टाकण्यात आली होती, त्याचप्रमाणे अहेरी उपविभागातील सर्व परिचीत असलेली एका संघटनाच्या वतीने नगर पंचायत अहेरीचे निषेध करून स्वतः खड्डे बुजविण्यासाठी गिट्टी टाकण्यात आली होती, मात्र एका आठवडाच्या आतमध्येच रस्त्याच्या परिस्थिती जैसी की तैसी निर्माण झाल्याने अहेरी शहरातील ठीक ठिकाणीं चर्चा सुरू आहे.

 

येणाऱ्या जिल्हा परिषद व नगर पंचायतीच्या निवडणूकित आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लोकांच्या डोळ्यात तेल घालून नागरिकांची दिशा भूल करण्याचे काम करण्यात आले आहे. अगोदर अहेरी शहरातील रस्ते अरुंद असल्यानें नागरीकांना रहदारीस मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती कऱण्यात यावी अशी मागणी अहेरीवासीयांनी केली आहे.

 

 

तात्पुरती स्वरूपात गिट्टी टाकून जनतेची दिशाभूल करण्याचे काम – भगतसिंग फॅन्स क्लब अहेरी

जिल्हा परिषद व नगर पंचायतची निवडणूक डोळ्या समोर ठेऊन मोठ्या पक्षाचे अहेरीचे पदाधिकारी व अहेरी उपविभागातील आदिवासी बांधवासाठी काम करण्यात संघटना कडून अहेरीच्या मुख्य मार्गावरील गांधी चौक व बसस्थानक रस्त्यावर तात्पुरती स्वरूपात गिट्टी टाकून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत, जर खड्डे संपुष्टात आणायचे असेल तर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे असे मत येथील भगसिंग फॅन्स क्लबचे पदाधिका-यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here