बाल अधिकार व दत्तक सप्ताह निमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न

0
453

बाल अधिकार व दत्तक सप्ताह निमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न

राजु झाडे

चंद्रपूर, दि. 22 नोव्हेंबर: लोकसंमग्रह समाज सेवा संस्था, बल्लारपूर द्वारा संचालित रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन, अंतर्गत चाईल्ड लाईन से दोस्ती कार्यक्रमाद्वारे, जिल्हा महिला व बाल कल्याण विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त सहकार्याने गौरक्षण वार्ड येथे बाल अधिकार सप्ताह व दत्तक सप्ताह विषयी जागृती कार्यक्रम संचालक फा. जोबीन ओवेलील यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. या कार्यक्रमाला मा. अजय साखरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, चंद्रपूर मा.सचिंद्र नाईक, कायदा व परिविक्षा अधिकारी जिल्हा बाल संरक्षण कक्ष,चंद्रपूर मा. वंदना भडके, अंगणवाडी सेविका, मा. भास्कर ठाकूर, समन्व्यक, त्रिवेणी हाडके, सल्लगार, रेल्वे चाईल्ड लाईन, बल्हारशाह आदी मान्यवर उपस्थित होते.

अजय साखरकर, यांनी बालकल्याण योजना व जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कार्य व दत्तक सप्ताह बाबत माहिती दिली. तर कायदा व परिविक्षा अधिकारी सचिंद्र नाईक यांनी बालकांचे कायदे व सुरक्षा याबाबत मार्गार्दर्शन केले. रेल्वे चाईल्ड लाईनचे समन्वयक भास्कर ठाकूर यांनी बालकांचे हक्क व बालकाविरुध्द अत्याचार या विषयी माहिती देवुन अशा अत्याचारांना प्रतीबंध करणे ही सर्वाची जबाबदारी आहे असे सांगून बालकांवरील अत्याचाराबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ चाईल्ड हेल्प लाईन क्रमांक १०९८ , पोलीस हेल्प लाईन -१०० किंवा स्थानिक पोलीस ठाणे येथे देणेबाबत नागरिकांना आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन रेल्वे चाईल्ड हेल्प लाईन टीम मेंबर बबिता लोहकरे यांनी केले. तर आभार लक्ष्मण कोडापे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय अमर्थराज, अतुल मडावी, सुरेंद्र धोडरे, हिमताई वांढरे,अजय देऊरघरे, धर्मेंद्र मेश्राम, कविता दोमाला, इशिका बर्वे, रेल्वे चाईल्ड लाईन टीम सदस्य नी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here