आवाळपुर येथे पांदण रस्त्यांची दुरावस्था

0
778

आवाळपुर येथे पांदण रस्त्यांची दुरावस्था

पांदण रस्त्यांसाठी शेतकऱ्यांची फरफट…

 

 

कोरपना, नितेश शेंडे

आवाळपुर : कोरपना तालुक्याच्या प्रत्येक गावात शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते असून या रस्त्यांची महसूल दप्तरी नोंद आहे. मात्र देखभाली अभावी तालुक्यातील बऱ्याच पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत. शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पांदण रस्त्यांचा उपयोग होतो. तालुक्यातील काही पांदण रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून मातीकाम झाले आहे. तर काही गावानजीकचे रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. हे रस्ते पायवाट म्हणून अजुनही वापरले जात आहेत. आवाळपुर परिसरात पांदण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पाण्याच्या डबक्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे. पावसाळ्यात पांदण रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून पांदण रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

 

आवाळपुर येथील हाच तो पांदण रस्ता

 

 

आवाळपुर परीसरातील कन्नाके यांच्या शेतापासून ते बोधाने यांच्या शेतापर्यंत 850 मीटर, जनाबाई वानखेडे यांच्या शेतापासून ते उद्धव देवाळकर यांच्या शेतीपर्यंत 600 मीटर, सातपुते यांच्या शेतापासून ते कवडू कोंडेकर यांच्या शेतापर्यंत 800 मीटर, बंडू बदखल यांच्या शेतापासून ते रमेश दिवे यांच्या शेतापर्यंत 500 मीटर पांदण रस्त्यांचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. ऐन शेतीचा हंगामात पांदण रस्ता नसल्याने शेतीचे कामे करणे सुद्धा कठीण झाले आहेत. शेतीचे कामे कसे करावे असा प्रश्न पडला असून बैलगाडी घेऊन जाणे तर दूरच शेतमजुरांना घेऊनही जाण्यास रस्ता नसल्याने शेती कशी करावी असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा तसेच पांदण रस्ता गाव नकाशा दाखवून पांदण रस्ता ताबडतोब करून देण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here