एम एच २९ हेलपिंग हॅन्ड्स नि दिले एक दिवसाआड दोन वन्य जीवांना जीवनदान

0
603

एम एच २९ हेलपिंग हॅन्ड्स नि दिले एक दिवसाआड दोन वन्य जीवांना जीवनदान

संजय कारवटकर राळेगाव तालुका प्रतिनिधी, 7499602440
यवतमाळ/राळेगाव
राळेगांव : राळेगाव येथील गेस्ट हाऊस येथून दुपारच्या वेळेस एम एच २९ हेलपिंग हॅन्ड्स चे तालुका अध्यक्ष संदीप लोहकरे यांना प्रवीण वडतकर यांनी फोन करून कळविले कि एक गव्हाणी घुबड (indian barn owl ) जखमी अवस्थेत रेस्ट हाऊस मध्ये आडोसा घेऊन बसले आहे. तेव्हा एम एच २९ हेलपिंग हॅन्ड्स चे मेंबर त्वरित त्या ठिकाणी पोहचून त्या घुबडाला आपल्या ताब्यात घेतले व शहानिशा केली असता असे कळले कि तो घुबड गंभीररीत्या जखमी झालेला आहे. नंतर त्या घुबडाला राळेगाव येथे प्रथमोपचार केल्यानंतर वनविभागाला सोबत घेऊन जंगलात सोडण्याचा प्रयत्न केला असता असे कळले कि तो उडू शकत नाही त्याच्या एका पंज्याला इजा झाली होती. नंतर त्या घुबडाला वनविभागाच्या मदतीने पुढील उपचारासाठी वर्धा येथील करुणा आश्रम peaple for animal पिंपरी मेघे, वर्धा या संस्थेकडे सोपविण्यात आले. त्या जखमी घुबडावर त्या संस्थेमध्ये पुढील उपचार सुरु आहेत.
अधिक माहिती घेतली असता प्राणीमित्र संदीप लोहकरे सांगतात कि तो घुबड गव्हाणी घुबड असून त्याला indian barn owl असे म्हणतात. भारतात त्याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. याला मराठी मध्ये पिंजरा, कानेल, चहारा अशी आहेत. गव्हाणी घुबड हा पक्षी साधारण ३६ सेमी आकाराचा असतो. हे पक्षी एकट्यात किंवा जोडीने इमारती, किल्ले, कडेकपारी शेतीचे प्रदेश येथे राहणे पसंद करतात. उंदीर, घुशी, सरडे, पाली हे त्यांचे मुख्य खाद्य असते. एकच घरटे वर्षानुवर्षे वापरण्याची सवय या पक्षांना असते. मादी एकावेळी पांढरे गोलसर असे ४ ते ७ अंडी देते.
तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता एम एच २९ हेलपिंग हॅन्ड्स च्या टीम ला फोन आला कि एक हरीण (काळविट ) हे कळपापासून भटकून राळेगाव येथील पोलीस स्टेशन परिसरात कुत्र्यांपासून स्वतःचा जीव वाचवत भटकत होते. तेव्हा एम एच २९ हेलपिंग हॅन्ड्स च्या चमू तिल आदेश आडे यांनी त्या हरणाला पकडले. तो खूप जखमी अवस्थेत त्या ठिकाणी होता. हि माहिती एम एच २९ हेलपिंग हॅन्ड्स चे अध्यक्ष संदीप लोहकरे यांना मिळताच त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या हरणाची शहानिशा केली व लगेच वनविभागाशी संपर्क साधून त्याला राळेगाव येथील वैद्यकीय दवाखान्यात प्रथमोपचारा साठी नेण्यात आले. त्याला तेथे प्रथमोपचार देण्यात आले. पण त्याला जास्त इजा झाल्याने त्याला चालत येत नाही आहे. आता सध्या तो दोन दिवस देखरेखीमध्ये होते. पुढील उपचारासाठी त्याला करूणा आश्रम (people for animal ) वर्धा येथे पाठवण्यात आले असून तेथे त्या हिरवं (काळिवट) वर पुढिल उपचार सुरू आहेत.
एम एच २९ हेलपिंग हॅन्ड्स हि संस्था मागील ५ वर्षांपासून राळेगाव येथे कार्यरत आहे. त्यांनी अनेक वन्यजीव व मुक्या प्राण्यांना मदत केली आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here