भोले बालाजी फाउंडेशन संस्थापक, स्थानिक महिला बचत गट व रहिवाशी यांच्याकडून सार्वजनिक हळदी कुंकू समारंभाचे आयोजन

0
414

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

भोले बालाजी फाउंडेशन संस्थापक, स्थानिक महिला बचत गट व रहिवाशी यांच्याकडून सार्वजनिक हळदी कुंकू समारंभाचे आयोजन

माननीय आमदार श्री. महेंद्र शेठ थोरवे ह्यांच्या उपस्थिती

केबीके नगर शेलु येथे सार्वजनिक उत्सव समिती भोले बालाजी फाउंडेशन संस्थापक माननीय श्री. निलेश दादा कोळेकर व स्थानिक महिला बचत गट व रहिवाशी यांच्याकडून सार्वजनिक हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला कर्जत खालापूर विधानसभा आमदार माननीय श्री. महेंद्र शेठ थोरवे हे सपत्नीक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला स्थानिक महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला, किमान ८०० महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मनोहर कदम यांनी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडले सदर कार्यक्रमाचे नियोजन पाहून माननीय आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांनी आपल्या भाषणातून केबीके नगर उत्सव समिती महिला बचत गट यांची प्रशंसा केली, सदर कार्यक्रमात मनोरंजनाचा भाग म्हणून नटराज डान्स अकॅडमी कोरियोग्राफर श्री.शंकर पोटे यांच्या बालकलाकारांनी अत्यंत उत्कृष्ट पणे आपली कला सादर केली, सदर कार्यक्रमात आठ पैठणी साड्यांचा लकी ड्रॉ काढण्यात आले, आठशे महिलांमधून विजेत्या आठ महिलांना भोले बालाजी प्रोप्रायटर माननीय निलेश दादा कोळेकर व आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले, बालकलाकारांचे उत्कृष्टअसे डान्स पाहून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सर्व बाल कलाकारांचे कौतुक केले व कोरिओग्राफर शंकर पोटे यांचा सत्कार करण्यात आला. श्री. महेंद्र शेठ थोरवे यांनी केबीके नगरच्या विकासाकरिता अकरा लाखांचा निधी जाहीर केला व यापुढे इतर कामासाठी सुद्धा सातत्याने तुमच्याबरोबर प्रयत्न करणार आहोत असे जाहीर आवाहन केले.
सदर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व टिपलेली ही काही क्षणचित्रे.
माननीय आमदार
श्री. महेंद्र शेठ थोरवे.
सौ. मीनाताई महेंद्र शेठ थोरवे.
सौ. रेखाताई ठाकरे महिला जिल्हा अध्यक्ष.
सौ. सुषमाताई ठाकरे सभापती रायगड पंचायत समिती.
सौ. आरती घोलप माजी सभापती.
श्री. संकेत भासे नगरसेवक कजॆत.
श्री अंकुश दाभने उपतालुका प्रमुख शिवसेना.
श्री सुभाष मिनमिने विभाग प्रमुख.
श्री सुरज तरे शाखाप्रमुख शेलु.
श्री हनुमंत भगत सर.
श्री सतिश निमने, बांधिवली
श्री निलेश कोलेकर, अध्यक्ष भोले बालाजी फाऊंडेशन.
सौ. आशा निलेश कोलेकर उपाध्यक्ष भोले बालाजी फाऊंडेशन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here