उस्मानाबादचा सामाजिक कार्यकर्त्याचा गाैरव! भारतीय बंधुता संघाचा समाज भुषण पुरस्कार गणेश वाघमारेंना घाेषीत 

0
736

उस्मानाबादचा सामाजिक कार्यकर्त्याचा गाैरव! भारतीय बंधुता संघाचा समाज भुषण पुरस्कार गणेश वाघमारेंना घाेषीत 
🟨🟩उस्मानाबाद :- 🟥किरण घाटे🟪🟧🟨सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ता गणेश रानबा वाघमारे यांना साेलापूरच्या भारतीय बंधुता संघाच्या वतीने या वर्षी दिला जाणारा समाज भुषण पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला असल्याची माहिती उपरोक्त संस्थेच्या एका पदाधिका-याने एका प्रसिद्ध पत्रकातुन आज (बुधवारी) दिली. 🟥🟩🟪🟨🟧🌼🟦🟩🟥🟨🟩🟪गणेश वाघमारे यांनी असंघटित कामगार, घरेलु महिला कामगार, शेतकरी, दलित वस्ती सुधार योजना, लोक वस्तीतील अनाधिकृत चालणा-या जनावरांच्या कत्तलखाण्यांपासुन नागरिकांच्या आरोग्यांचा प्रश्न, पाण्या बाबत देशहितासाठी राष्ट्रिय नदी जोड प्रकल्प लवकर पुर्ण करण्यासाठी दिल्ली येथील जंतर मंतर वरती उपोषण,धार्मिक स्थळातील संपत्ती देश हितासाठी खर्च करावी, बेटी बचाव बेटी बचाव, स्त्री भ्रुण हत्त्या रोखणे, शेतकरी, कोरोना काळातील जनजागृती, मतदार जनजागरण मोहीम, ग्राहक जनजागृती, वैद्यकीय महाविद्यालय, अंधश्रद्धा निर्मुलन, तृतीय पंथी, दिव्यांग, कोरोना संकटात सर्वसामान्यांना उपाय योजना शासनाने केली असता त्याच बाबींवर वेश्याव्यवसाय करणा-या घटकांना सुविधा उपलब्ध करण्याबाबत,छोटे उद्योजक, बेरोजगारी, कंत्राटी कामगार, घरकुल योजना, आदिं विषयांवर त्यांनी कार्य केले असून निरंतर ते करित आहेत, उस्मानाबाद पासुन ते मुंबई, दिल्ली पर्यंत उपोषणास बसुन केंद्र व राज्य सरकारचे लक्ष त्यांनी वेधले आहे.हे विशेष ! 🟨🟩🟥🟪🟧🟦🟪🟥🟨🟩🟦🟪🟦सन 2016 पासुन ते आजतागायत नदि जोड प्रकल्पाबाबत केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने ते पाठपुरावा करीत आहेत.अगदी सामान्य परिस्थितीमध्ये राहुन त्यांनी जातनिरपेक्ष,धर्मनिरपेक्ष इतकेच नव्हे तर पक्ष पार्टी निरपेक्ष भुमिकेतुन ते समाजहित, जनहित, देशहितासाठी कार्य करित आहेत. उस्मानाबाद सारख्या मराठवाड्यातील औद्योगिक दृष्ट्या मागासलेल्या परिसरात राहत असले तरी देशभरातील घडामोडी वर त्यांची नजर असते..अशा या कार्याची दखल घेत भारतीय बंधुता संघ यांनी सन 2021 चा समाज भुषण पुरस्कार त्यांना जाहिर केला.शाल,प्रमाणपत्र व पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप असुन सदरहु पुरस्कार जाहीर झाल्याबाबत त्यांचे सर्वस्तरांवरु अभिनंदन व शुभेच्छा देवुन गौरव केला जात आहे.🟩🟪🟨🟥🟧🟦🟥🟥🟪🟥🟩🟨🟦 दरम्यान त्यांचे पत्नी साधना वाघमारे ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या एक जेष्ठ सदस्या आहे .गणेश वाघमारे यांच्या पुरस्काराच्या घोषणेची बातमी कानावर येताच सहजं सुचलंच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे , सहसंयाेजिका मायाताई काेसरे, प्रभा अगडे , सुविधा बांबाेडे ,सराेज हिवरे , रजनी रणदिवे , श्रुति कांबळे , प्रतिभा चट्टे , सुवर्णा कुळमेथे , सायली टाेपकर , प्रदन्या भगत , सुविधा चांदेकर आदिंनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभकामना दिल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here