रस्त्यावरील अवैध बांधकाम साहित्य व ब्रेकर हटविण्याची मागणी

0
399

वारंवार तक्रारीनंतर ही नगर परिषदेचे दुर्लक्ष

अमोल राऊत
राजुरा, दि. 31 जुलै : शहरातील आठवडी बाजार वार्डामध्ये अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य सार्वजनिक रस्त्यावर ठेवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. याबाबत नगर परिषदेतील बांधकाम व अतिक्रमण विभागात वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याचे नागरिकांकडून तीव्र रोष व्यक्त केल्या जात आहे.
आठवडी बाजार वार्डातील इंदिरा शाळेमागील परिसरात अगदी अरूंद रस्त्यावर एका गृहस्थाकडून अवैधपणे रेती ठेवण्यात आलेली आहे. मागील महिणाभरापासून ही रेती तशीच पडून असल्याने नागरिकांना वाहने ने-आण करतांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच याच रस्त्यावर अवैध व अनावश्यक अगदी 2-2 मीटरच्या अंतरांवर गतीरोधक (ब्रेकर) तयार करण्यात आले असून या गतीरोधकांमुळे नियमीत याठिकाणी किरकोळ अपघात घडत आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांकडून वारंवार नगर परिषदेतील बांधकाम व अतिक्रमण विभागात तक्रारी करण्यात आल्या आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून आश्वासने देवून रहिवास्यांची समज काढण्याचे काम केले आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नगर परिषदेच्या कामाबद्दल असंतोष निर्माण झाला आहे.
नगर परिषदेकडून मोहीम राबवून रस्त्यावरील अतिक्रमण, अनावश्यक गतीरोधक काढणे आवश्यक असते. परंतू अधिकारी व कर्मचारी यांचे अर्थपुर्ण संबंधातून असे प्रकार पाठीमागे घालत असल्याचे दिसून येत आहे. अगदी अरूंद रस्त्यावरील अतिक्रमण, गतिरोधक व अवैधपणे ठेवण्यात आलेले बांधकाम साहित्य यामुळे कुणाचा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न ही नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगर परिषदेतील अभियंते व कर्मचारी अर्थ संबंधातून अशा प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत असून तातडीने अवैध ब्रेकर, रेती साठा व अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात येत आहे.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here