Ilनियमितपणाचे महत्वll

0
738

Ilनियमितपणाचे महत्वll
चंद्रपूर 🟪🟩🟧किरण घाटे🟩🟨महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या जेष्ठ सदस्या सराेज हिवरे यांनी नियमितपणाचे महत्व या विषयावर एक अल्पसा लेख शब्दांकित केला ताे खास वाचकांसाठी देत आहाेत! 🟪🟩🟦🟥🟪🟧🟦🟨🟥काही लोक कार्याची सुरवात अगदी उत्साहात करतात. परंतु काही दिवसातच त्यांचा उत्साह कमी होत जातो. परिणामी कार्यात नियमितपणा राहत नाही. कोणीही एखाद्या कामाची सुरवात करतो. तेव्हा त्याला लगेचच यश मिळत नाही परिणामी तो ते कार्य अर्धवट सोडून देतो.
मनुष्याचा मूड बदलताच त्याचे विचार बदलतात. पण त्यासाठी ऐक सूत्र लक्षात ठेवा, तुमचा मूड जर तुमच्या मुठीत असेल तर तुमच नशीब देखील तुमच्या मुठीतच असत. मनुष्य जेव्हा त्याच्या मूड नुसार एखाद्या कामाची टाळाटाळ करतो. तेव्हा तो त्या कामात नियमितपणा राखू शकत नाही. जस सकाळी झोपेतून उठताच एखाद्याच्या मनात विचार येतो आज माझा व्यायाम करायचा मूडच नाही. असा विचार येणे साहजिकच आहे. परंतु त्या विचारा कडे दुर्लक्ष करून ते काम करणे आवश्यक असते.
🟥🟪🟧🟦🟩🟩🟩🟩🟨🟩🟧मी हे काम आत्ता करू शकत नाही असं ज्यावेळी तुम्हाला वाटेल. तेव्हा स्वतःला ऐक प्रश्न विचारा की, मी किमान किती वेळ हे काम करू शकतो. मन म्हणेल दहा मिनिटे मग मनाला आपल्या बाजूला वळवीन्यासाठी किमान पाच मिनिटे तरी ते काम अवश्य करा.
नियमित पणे उचललेल ऐक छोट पाऊल मनुष्याला यशाच्या शिखरा पर्यत पोहचवन्यास मदत करते. यासाठी शिखरावर पोहचण्याची घाई न करता. आज मी कोणत पाऊल उचलू शकतो यावर विचार करून त्याची अंमलबजावणी करायला हवी. मनाचे गुलाम न बनता मूड आपल्या ताब्यात ठेवायला हवा. मन कित्येक बहाणे देऊन कामापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असत. काम टाळण्यासाठी असंख्य कारण त्याचेकडे असते. परंतु या सर्व बहाण्याच्या विरुद्ध जाऊन ऐक छोट पाऊल उचलायला हवं.
कारण याच एका उचललेल्या पाऊला मुळे पुढे तुम्ही तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन आणू शकाल.
यासाठी नियमितपणा हा गुण अंगीकरायचा असेल तर तुमचं लक्ष सुस्पष्ट असू दया. नियमित पणा मुळेच सृष्टीचे चक्र चालू आहे. नियमितपणा हाच निसर्गाचा आधार आहे. त्यामुळेच खरं तर आपल शरीर जिवंत आहे. यासाठीच नियमित पणाचे महत्व जाणून छोटी छोटी पाऊल टाकत यशस्वी जीवनाकडे वाटचाल सुरु करा. अगदी आजपासून नव्हे तर आत्तापासून तेही नियमितपणे…

सरोज वि. हिवरे
सहकार नगर रामपूर राजुरा जिल्हा चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here