जागतिक आरोग्य दिनी मुलांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

0
487

जागतिक आरोग्य दिनी मुलांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

कुनघाडा येथे मॅजीक बस इंडिया फाऊंडेशनचा विशेष उपक्रम

चामोर्शी तालुक्यात २८ गावातील २०३० मुला-मुलींचा खेळाच्या माध्यमातून करणार विकास

आरोग्य स्वच्छता, शिक्षणाचे महत्व, पोषण आहार, स्त्री-पुरुष समानता यावर मॅजीक बस इंडिया फाऊंडेशन देणार विशेष भर

चामोर्शी/प्रतिनिधी, दि. ८ एप्रिल : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुनघाडा येथे मॅजीक बस इंडिया फाऊंडेशन, नेस्ले हेल्दी किट्स यांच्या मार्फत मुलांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक दुर्गे सर, आरोग्य सहाय्यिका आशा गायकवाड, परिचारिका बायस्कर, कंत्राटी आरोग्य सेविका बावणे, आशा स्वयंसेविका वंदना वाघाडे, मॅजीक बस इंडिया फाऊंडेशन तालुका समन्वयक योगिता सातपुते आणि युवा मार्गदर्शक झिन्नत सैयद तसेच शिक्षक, शिक्षिका समस्त गावकरी, नागरिक उपस्थित होते.
सद्या जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून आरोग्य शिबिरात सोशल डिस्टंन्स, मास्क, सॅनिटायझरचा वापर करून कार्यक्रम घेण्यात आले.

चामोर्शी तालुक्यात मॅजीक बस इंडिया फाऊंडेशन, यांच्या मार्फत २८ गावातील २०३० मुला-मुलींना कौशल्य, कला, आरोग्याची काळजी, स्वच्छता अभियान, पोषण आहार, शिक्षणाचे महत्व, स्त्री-पुरुष समानता, आपले अधिकार यावर ११ ते १४ वयोगटातील मुलां-मुलींसाठी खेळाच्या माध्यमातून विकास करण्यावर विशेष भर या संस्थेमार्फत देण्यात येते. यावेळी कुनघाडा शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक, शिक्षिकांना Thank You टीचर्स म्हणून ग्रीटिंग कार्ड्स हाताने बनवलेले देऊन स्वागत केले.

कुनघाडा येथे मॅजीक बस इंडिया फाऊंडेशन, नेस्ले हेल्दी किट्सच्या चामोर्शी तालुका समन्वयक योगिता सातपुते यांनी आरोग्य तपासणी शिबिरात मार्गदर्शन करतांना आजच्या काळात आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. कारण खराब जीवनशैलीने आपले संपूर्ण जीवन व्यस्त झाले आहे. त्यामुळे ५० ते ६० च्या दरम्यान येणारे आजार आता लहान मुले आणि तरुणांनाही होत आहेत. या आजाराचे सर्वात मोठे कारण म्हणजे चुकीची खाण्याची पद्धत आणि चुकीच्या सवयी यामुळे आपले वजन वाढते आणि वजन वाढल्याने अनेक त्रास होतात. वजन कमी करण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करतात मात्र यश मिळत नाही. कारण त्यांच्या सवयी सुधारत नाही. म्हणून सशक्त राहण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे, वेळेवर जेवण करणे, झोपणे, सकाळी लवकर उठून आपल्या आरोग्याची काळजी घेतल्याने आपण सशक्त राहू शकणार. असे प्रतिपादन करण्यात आले. तर याच कार्यक्रमात कुनघाडा येथील मॅजीक बस इंडिया फाऊंडेशन, नेस्ले हेल्दी किट्सच्या युवा मार्गदर्शक झिन्नत सैयद यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्याने आरोग्याची काळजी घेण्याविषयी विशेष भर दिला.

बेड टी ची सवय दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटावर पाणी पिऊन केली पाहिजे जेणेकरून पोट योग्य प्रकारे साफ होईल, कारण पोट अनेक त्रासांचे मूळ आहे. परंतु बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी बेड टी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. रिकाम्या पोटी चहा पिण्यामुळे आंबटपणा, गॅस इत्यादी त्रास होतात आणि शरीराला खूप नुकसान होते.

न्याहारीबाबत निष्काळजीपणा काही लोक लठ्ठपणा कमी करण्याच्या नादात सकाळचा नाश्ता टाळतात. ही सवय तुमच्या आरोग्यावर खूप भारी पडू शकते. आपल्या शरीराचे चयापचय खराब होऊ शकते. सकाळी पोटभर नाश्ता केला पाहिजे, जेणेकरुन सकाळी पौष्टिक पदार्थ शरीरात पोहोचू शकतील आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहिल. न्याहारीमध्ये आपण अंकुरलेले धान्य, ज्युस, व्हेजिटेबल उपमा, पोहा, हरभरा इत्यादी खाऊ शकता.

व्यायाम न करणे दिवसभर आपण जे काही खातो, त्याद्वारे शरीरात भरपूर कॅलरी पोहोचतात. आजकालच्या यांत्रिक युगात शारीरिक कार्य अधिक होत नाही, म्हणून व्यायाम करणे खूप महत्वाचे झाले आहे. लठ्ठपणा केवळ लठ्ठपणा वाढवत नाही तर शरीराच्या सर्व भागांमध्ये समस्या निर्माण करते. म्हणून व्यायामासाठी दररोज कमीत कमी एक तास काढा आणि रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ चाला.बाहेरचे पदार्थ खाणे आणि रात्री उशिरापर्यंत जागणे
जर आपण बाहेर खाण्याची आणि रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय सोडली नाही तर आपण कितीही प्रयत्न केले तरी आपले शरीर पूर्णपणे फिट होऊ शकत नाही. बाहेरच्या अन्नात खराब तेल, मजबूत मसाले आणि सर्व हानिकारक गोष्टी असतात, ज्यामुळे तुमचे शरीर अशक्त होते आणि सर्व समस्या उद्भवतात. या व्यतिरिक्त रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने तुमच्या स्लिपिंग क्लॉकमध्ये गडबड होते. झोप न लागल्याने थकवा, डोकेदुखी, अशक्तपणा, आळस आणि इतर बर्याकच प्रकारच्या समस्या सुरू होतात. तर तुम्हाला फिटनेस हवा असेल तर या सवयी कायमच्या सोडा. या आरोग्याच्या घेण्यात येणाऱ्या काळजी संदर्भात विस्तृत माहिती युवा मार्गदर्शक झिन्नत सैयद यांनी दिली.
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शिक्षक, शिक्षिका आणि समस्त गावकऱ्यांना पहिल्यांदाच आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यासमवेत अधिक माहिती प्राप्त झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here