मालती सेमले यांचा बालकविता संग्रह सर्वांगिण सुंदर!

0
692

मालती सेमले यांचा बालकविता संग्रह सर्वांगिण सुंदर! 🟪गडचिराेली🟫किरण घाटे♦️गडचिराेली जिल्ह्यातील सुपरिचित कवयित्रि मालती सेमले यांचा बालकविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला .विदर्भातील सुप्रसिद्ध कवी, समिक्षक प्रा. देवबा पाटील यांनी माझ्या बाग आम्हा मुलांची बाल काव्यसंग्रहाचे समिक्षण केले आहे .त्यांचे शब्दांतिल समिक्षण खास वाचकांसाठी आम्ही देत आहाेत!

“बाग आम्हा मुलांची” हा बाल काव्य संग्रह। नुकताच वाचून झाला। काव्यसंग्रह वाचताना महत्त्वाचे असे जाणवले ते म्हणजे आपण स्वतः शिक्षिका तर आहेतच परंतु मुलांच्या भावविश्वाशी आपण अतिशय समरस होऊन ह्या सगळ्या बाल कविता लिहिल्या आहेत ।सगळेच शिक्षक मुलांच्या भावविश्वा सोबत आपले नाते जोडत असतातच असे नाही परंतु तुम्ही आपल्या मुला मुलींसोबत एक अतिशय महत्त्वाचे भावनिक नाते जोडलेले आहे ।आणि त्या नात्यातूनच उमललेल्या व आपल्या प्रतिभेद्वारे फुललेल्या ह्या विविध बाल कविता वाचताना मनाला आनंद देऊन जातात ।आपल्या ह्या बाळ काव्यसंग्रह मध्ये मुलांच्या भावविश्वात असलेले जवळपास सगळे विषय आलेलेआहेत। ह्या बाल काव्यसंग्रह मध्ये फुलांची उपवने आहेत , झाडांची वने आहेत, निसर्गाचे सौंदर्य आहे, प्राण्यांच्या गमती आहेत, पक्षांच्या जमती आहेत, मुलांसाठी हिरवी शेते आहेत, राणा ची मजा आहे। आपण ह्या बाल काव्यसंग्रह मधून मुलांना त्यांच्या बाल विश्वातील जवळपास सगळ्या गोष्टींची उत्कृष्टरित्या ओळख करून दिलेली आहे। चंद्र, चांदण्या, आकाश ह्यासोबत धरती, शेते, राने वने हेसुद्धा या काव्यसंग्रहात आवर्जून आलेले आहेत। शाळेत गेल्यानंतर मुलांना आकड्यांची करामत शिकावी लागते ती आपण अतिशय छानपणे उलगडून दाखवली आहे। पाटी लेखणी चे महत्त्व आपोआप मुलांच्या मनावर ठसते ।बाईचे शिकवणे मुलांच्या मनावर बिंबते। ह्यामध्ये कुत्रा आहे, मांजर आहे या सोबतच मुलांची आवडती सायकल सुद्धा आहे । लहान बालकांना वेगवेगळ्या पोशाखांची आवड असते, खाऊ ची गोडी असते हे सगळे आपण ह्या मध्ये जुळवून आणले आहे त्यामुळे हा काव्यसंग्रह मुलांच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्कृष्ट आणि मुलांचे मनोरंजन करणारा झालेला दुधात साखर टाकलेला झाला आहे। त्यामधून मुलांना हळूच पणे काही ना काही गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात। आपला शिक्षिकेचा हाडाचा पिंड व कवयित्रीचा जातीवन्त पिंड हे दोन्ही ह्या काव्यसंग्रह मधून हातात हात मिळवून सोबत चालताना दिसतात। इतका उत्कृष्ट बालवेधक काव्यसंग्रह आपण सादर केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! त्याचप्रमाणे यशोदीप पब्लिकेशन्स यांनी हा काव्यसंग्रह अतिशय आकर्षक स्वरूपात प्रकाशित केला त्याबद्दल रूपालीताई अवचरे व निखिल लांभाते यांचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन, आपल्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व शुभकामना!

प्रा. देवबा पाटील खामगाव, विदर्भ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here