कुलथा घाटावर महसूल विभागाची धडक कारवाही
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या नऊ ट्रॅक्टर जप्त

गोंडपिपरी (सुरज माडुरवार)
तालुक्यातील कुलथा घाटावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या आठ ट्रॅक्टर वर तहसीलदार कें. डी.मेश्राम यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी सुर्वे यांच्या नेतृत्वातील चमूने यांनी दि १० बुधवारी पहाटे 1 वाजता गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा नदीघाटावर धडक कारवाही केली. यावेळी त्यांनी घाटावर नऊ ट्रॅक्टर पकडल्या सदर वाहन रात्रीच येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या.सुर्वे यांनी केलेली ही तालुक्यातील सर्वात मोठी कार्यवाही असल्याचे बोलल्या जात आहे.
गोंडपिपरी तालुका खनिज संपत्तीने नटला असून सभोवताल अनेक नदी,नाले आहेत.येथील रेती ला प्रचंड मागणी आहे.अश्यातच कुठल्याच रेती घाटाचे सध्या स्थितीत लिलाव झाले नसतांना गेल्या काही दिवसापासून अनेक नदीतून रेती चा उपसा होऊन त्याची सर्रास अवैध वाहतूक सुरू आहे.यातच काल दिनांक 10 नोव्हेंबर रोजी ट्रॅक्टर द्वारे कूलथा घाटावर रेती ची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. तहसीलदार के. डी.मेश्राम यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी सुर्वे यांनी पहाटे 1 वाजता घाटावर धडक दिली. यावेळी त्यांच्यासोबत तालुक्यातील पटवारी यांची चमू होती. सुर्वे यांच्या नेतृत्वात या चमूने रेती भरून असलेल्या ९ ट्रॅक्टर वरती कारवाही केली.जप्त केलेल्या ट्रॅक्टर तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आल्या असून सदर कारवाही मुळे रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.