चालकाची नजरचुक जीवावर बेतली

0
1085

चालकाची नजरचुक जीवावर बेतली

कोठारी नाल्यावर ट्रक उलटला   ●वाहन चालकाचा मृत्यू

 

कोठारी:– राज जुनघरे
गोंडपीपरी कडून बल्लारपूरकडे भरधाव जाणारा ट्रक कोठारी नाल्याजवळ चालकाच्या नजर चुकीने पलटी झाला.त्यात चालकाचा करून अंत झाल्याची घटना १२ मार्च चे रात्री ११ वाजता घडली.मृतक चालकाचे नाव दौलत कवडू दाते असे असून तो वरोरा तालुक्यातील निलजई येथील रहिवासी असल्याचे पोलीस सूत्रांकडून कळते.चालकाच्या नजर चुक त्याच्याच जीवावर बेतली.


बल्लारपूर-आष्टी राष्ट्रीय महामार्गावरील कोठारी येथिल नाल्यावर भिषण अपघात घडला. वाहन चालकाच्या अनावधानाने महामार्गावरील बंद असलेल्या पुलाच्या कड्यात ट्रक पलटी झाल्याने वाहनचाकाचा जागीच मृत्यू झाला. कोठारी राष्ट्रीय महामार्गावर बालाजी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून पुलाचे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे. नाल्यावर काही तांत्रिक अडचणी मुळे मोठ्या पुलाचे बांधकाम रखडले आहे. पुलावरून जाण्यासाठी मार्ग बंद असतांना रात्रो ११.०० वाजताचे दरम्यान ट्रक क्र. एम.एच. ३४ ए ०७०५ सिमेंट लोड खालीकरून बल्लारपूर कडे जात असताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने खाली ट्रक उलटला. यात वाहन चालक स्वतःचा बचाव करण्यासाठी उडी घेत असतांनाच ट्रकच्या खाली दबून मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या वाहन चालकाचे नाव दौलत कवडू दाते वय ४५ वर्ष असून तो निलजई ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे.घटना स्थळावर कोठारी पोलीस तात्काळ पोहचून पलटी झालेल्या ट्रकला बाजूला करून ट्रकमध्ये दबलेला वाहन चालकाचा मृतदेह ताब्यात घेतला.मृतकाच्या कुटुंबियांना घट नेची माहिती दिली व उतरनिय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केला. पुढील तपास ठाणेदार तुषार चव्हान करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here