महाशिवरात्री निमित्त सर्व भाषीय १०० भजन मंडळांचा ४ दिवसीय महोत्सव, यंग चांदा ब्रिगेडचे आयोजन

0
395

महाशिवरात्री निमित्त सर्व भाषीय १०० भजन मंडळांचा ४ दिवसीय महोत्सव, यंग चांदा ब्रिगेडचे आयोजन

 

 

महाशिवरात्री निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अंचलेश्वर मंदिर प्रांगणात सर्व भाषीय १०० भजन मंडळांचा ४ दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जिल्हाभरातून विविध भाषीय १०० भजन मंडळांनी सहभाग घेतला आहे.

१ मार्च ला मंगळवारी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी शहरातील सर्व शिवमंदिरांमध्ये तयारी सुरु आहे. दरम्याण यंदाची शिवरात्र धार्मीक आणि भजनाच्या मधूर गजरात साजरी करण्याचा निर्णय यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घेण्यात आला असून अंचलेश्वर मंदिर प्रांगणात सर्व भाषीय १०० भजन मंडळांचा ४ दिवसीय महोत्सवाचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता या महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, आचार्य संत श्री मनीष भाईजी महाराज, साईबाबा मंदिर, चंद्रपूरचे मसादे महाराज , वढा विठ्ठल मंदिरचे स्वामी चैतन्य महाराज, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळचे जिल्हा सेवाधिकारी अँड. दत्ताभाऊ हजारे, गुरुकुंज आश्रमच्या आजीवन प्रचारिका श्रीमती उषाताई हजारे, ग्रामगीताचार्य, जिल्हा प्रचार प्रमुख दादाजी नंदनवार आदि मान्यवरांची प्रमूख उपस्थिती राहणार आहे. तर सकाळी १० वाजता पासून भजन महोत्सवाला सुरवात होणार आहे. सदर महोत्सव ४ मार्च पर्यंत चालणार असून नागरिकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here