मूर्ती विमानतळ पूर्णत्वास नेऊन विमानसेवा सुरु करा 

0
572

मूर्ती विमानतळ पूर्णत्वास नेऊन विमानसेवा सुरु करा 

लोकसभेत खासदार बाळू धानोरकर यांची मागणी 
चंद्रपूर : चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी मूर्ती विमानतळ लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केली. पुरवणी प्रश्न दरम्यान उत्तर देताना नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की,  भूमी अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर आम्ही विमानतळाचे कामाला सुरवात करणार असल्याचे त्यांनी उत्तरात सांगितले.
चंद्रपूर पासून ४५ किमीवर राजुरा तालुक्यातील मूर्ती या गावाजवळ आवश्यक असलेल्या एकूण ८४० एकर जमिनी पैकी १४० एकर भूमीचे अधिग्रहण बाकी आहे. ७०० एकर जमिनीचे रजिस्टेशन झाले असून शेतकऱ्यांना त्यांचे धनादेश देखील देण्यात आले आहेत. वनविभाग, पर्यावरण, सॉईल टेस्टिंग, भूमी अधिग्रहण, प्रकल्प अहवाल सर्व प्रक्रिया व परवानग्या तयार असून उर्वरित जमीन अधिग्रहण प्रक्रिया झाल्याबरोबर मूर्ती विमानतळाचा मार्ग मोकळा होणार आहे.
मोरवा विमानतळावर सध्या सर्व प्रकारचे हेलिकॉप्टर व C 90 A, B 200, CJ 1 छोटी विमाने लेन्डिंग व टेकऑफ  करतात. या विमानतळाच्या दक्षिण – पूर्व व पश्चिम दिशेने वनविभागाची जमीन तर उत्तर बाजूने खासगी जमीन आहे. या ठिकाणी देखील रनवेची लांबी ७०० मीटर्स ने वाढविल्यास व औष्णिक केंद्राच्या बायलर्स बाबत तोडगे काढल्यास नियमित विमानसेवा सुरु होऊ शकते. याबाबत देखील नागरी उड्डाण मंत्र्यांनी खासगी विमान कंपन्यांची याबाबत अनुकूलता मागितली आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरच तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यास विमानतळ चंद्रपूर जिल्ह्यात उभारून येथील नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यासाठी मूर्ती विमानतळ पूर्णत्वास नेऊन विमानसेवा सुरु करा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here