कोठारीत वंचितचा वर्धापन दिन साजरा

0
440

कोठारीत वंचितचा वर्धापन दिन साजरा

 

कोठारी – वंचित बहुजन आघाडी शाखा कोठारी कडून तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
भारिप बहुजन महासंग ती वर्षांपूर्वी विलीन करून वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली.ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेतील राज्यातील तळागाळातील समाजाला न्याय व सत्तेत वाट मिळविण्याकरिता वंचित घटकाला एकत्रित करून आघाडी निर्माण केली. या माध्यमातून राज्यातील वंचितांच्या समस्या, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक वारसा जपत अनेक आंदोलने करण्यात आली.वंचितांना सत्तेत वाट मिळविण्यासाठी राजकीय संघर्ष निर्माण करण्यात येत आहे.वंचितच्या संघर्षाने राज्य शासन विचलित होऊन त्यांना भागीदारी देण्यासाठी महत्वाची पाऊले उचलण्यात पुढाकार घेत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.या प्रसंगी कोठारात वंचित आघाडी शाखेकडून तिसरा स्थापना दिवस संविधान चौक येथे साजरा करण्यात आला.केक कापून जल्लोष करण्यात आला.फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.चंद्रपूर जिल्हा महासचिव धीरज बांबोडे यांनी उपस्थितांना वंचित आघाडीचे ध्येय धोरणे, काम करण्याची पद्धत,वंचित घटकांना आघाडीत जोडण्याची प्रक्रिया जोरात शिरू करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना आव्हान करण्यात आले.वंचितचा ग्राम पंचायत सदस्य अमोल कातकर,कोठारी शाखा अध्यक्ष अनिल विरुतकर,लखन उराडे,सुरेश रंगारी , राजू जुनघारे, विनोद कुलसंगे, दीक्षा कातकर, माया भरणे, अब्रार सय्यद, विजय साखरकर, चेतन वासनिक,घनश्याम लाटेलवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here