रक्तदाते सचिन उपरे यांनी आपल्या गावतून सर्वात जास्त 35 वेळा रक्तदान केले मनून त्यांचा रक्तकेंद्र सामान्य रुग्णालय चंद्रपूर तर्फे सत्कार…!

0
595

रक्तदाते सचिन उपरे यांनी आपल्या गावतून सर्वात जास्त 35 वेळा रक्तदान केले मनून त्यांचा रक्तकेंद्र सामान्य रुग्णालय चंद्रपूर तर्फे सत्कार…!

 

Impact 24 news network

चंद्रपूर :- जागतिक रक्तदाता दिनाचे 14 जून 2021 औचित्य साधून आज राज्य रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मुंबई व रक्तकेंद्र सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजक संस्था व रक्तदाते यांचा सत्कार समारंभ चे आयोजन आज चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे केले होते.

ज्यांनी कोरोना काळात रक्तदान शिबिराचे आयोजन यशस्वीरित्या केले व सामाजिक दायित्व जपले, त्या सर्व संस्थांचा व रक्तदात्यांचा भव्य असा सत्कार समारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित मा. ना. विजय वडेट्टीवार मंत्री महाराष्ट्र शासन, तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर चे आमदार मा. किशोर जोरगेवार जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, जिल्हाधिकारी मा. अजय गुल्हाने, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर चे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे डॉ सोनकुसरे, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय चंद्रपूर चे डॉ. निवृत्ती राठोड, रक्तसंक्रमण अधिकारी सामान्य रुग्णालय चंद्रपूर डॉ. अनंत हजारे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.

कोरोना काळात रक्तदान शिबीर आयोजन केल्याबदल मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते सचिन उपरे समाजसेवा फाउंडेशन चे अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here