पोलीस नक्षल मध्ये चकमक सुरू – पोलीस नक्षल चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा

0
870

पोलीस नक्षल मध्ये चकमक सुरू –
पोलीस नक्षल चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा

ग्यारापत्ती–कोटगुल जंगल परिसरात सकाळच्या सुमारास झालेल्या चकमकीत सहा च्या वर नक्षल ठार झाल्याची शक्यता
■ पोलीस नक्षल चकमकीत खात्मा झालेल्या मध्ये नक्षल दलमचा मोठा नेता असल्याचा प्राथमिक अंदाज

 

गडचिरोली : ग्यारापत्ती–कोटगुल या घनदाट जंगलात आज झालेल्या चकमकीत ६ पेक्षा जास्त नक्षल पोलीस जवानांनी ठार करण्यात मोठे यश प्राप्त झाले आहे. पोलीस विभागाला सकाळच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहिती वरून ग्यारापत्ती–कोटगुल जंगल परिसरात नक्षल असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे सी-६० पोलीस जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांना जंगलत दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस जवानावर अंधाधुंद गोळीबार केला असता पोलीसा जवानांनी स्वरक्षनार्थ प्रतीउत्तर देत नक्ष्ल्यास जशाच तसे प्रतीउत्तर दिले.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस व नक्षल चकमक जवळपास दोन तास चाललेल्या अंधाधुंद दुमचक्री गोळीबारात सहा नक्षल ठार झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. पोलीस जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षल घटनास्थळावरून जंगलाचा आसरा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी पोलीस विभागाने जंगल परिसरात नक्षलविरोधी शोधमोहीम अधिक तीव्र केली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नक्षल्यांचे साहित्य हस्तगत करण्यात पोलीस जवानांना मोठे यश आले आहे.

पोलीस नक्षल चकमकी संदर्भात पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क केला असता घटनेला दुजोरा दिला असला तरी मृत नक्षल संदर्भात बोलण्यास टाळले आहे. मात्र या घटनेत नक्षल दलममधील मोठा नेता मारल्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे. अधिक माहिती पोलीस विभागाच दिल्यानंतर कळू शकणार असले तरी नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here