मक्केपल्ली येथे तलावात बुडून इसमाचा मॄत्यू. 

0
349

मक्केपल्ली येथे तलावात बुडून इसमाचा मॄत्यू. 

घोट: येथून ११किमी अंतरावर असलेल्या मक्केपल्ली येथील एकजनाचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३०वाजताचे दरम्यान घडली.
ओमदेव अर्जुन गांधरवार (वय ४५ रा. मक्केपल्ली) असे तलावात बुडून मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो बैल धुण्यासाठी तलावात गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला. पोहता येत नसल्याने तो बुडाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या सदर घटनेची तक्रार रेगडी पोलीस मदत केंद्रात दाखल केली गेली असून पुढील तपास रेगडी पोलीस मदत केंद्राचे पि.एस.आय. प्रमोद सरवर यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार चंद्रकांत डोंगरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here