‘वंचित’ ची दमदार एन्ट्री

0
635

‘वंचित’ ची दमदार एन्ट्री

गोंडपिपरी : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. यात वंचित बहुजन आघाडीच्या 5 उमेदवारांनी विजश्री मिळविला.

तालुक्यातील सकमुर सेवा सहकारी संस्था निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदाच प्रत्यक्षरीत्या भाग घेतला. प्रस्थापितांविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या 13 उमेदवारांनी भाग घेतला. यात 5 उमेदवार विजयी झाले. यर उर्वरित 8 उमेदवारांना मोजक्याच मतांनी पराभव पत्करावा लागला.

तालुक्यातील सेवा सहकारी संस्थेतील वंचितच्या धडाकेबाज एन्ट्रीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यात निवडून आलेल्या सदस्यांचा जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, तेजराज डोंगरे, डॉ. प्रकाश तोहोगावकर, रमेश लिंगमपल्लीवर, भगीरथ वाकडे, साईराज अलोने यांनी सत्कार करत नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सकमुर सह तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here