आरोग्य शिबीर हे सेवेचे माध्यम – आ. किशोर जोरगेवार

0
387

आरोग्य शिबीर हे सेवेचे माध्यम – आ. किशोर जोरगेवार

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घुग्घूस येथे भव्य नेत्रचिकित्सा व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन

१२०० रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

 

विकास कामांबारोगरच सामाजिक उपक्रमही गरजेची असून यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्या जात आहे. क्रिडा, सांस्कृतीक, शैक्षणीक क्षेत्रासह आरोग्य क्षेत्रावरही आमचा भर आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे याकरिता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे आयोजित केल्या जात असून खर पाहता आरोग्य शिबिर हे सेवेचेच माध्यम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

यंग चांदा ब्रिगेड घूग्घूस शाखेच्या वतीने घुग्घूस येथील आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भव्य नेत्रचिकित्सा व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला काँग्रेस कमेटीचे घुग्घूस शहराध्यक्ष राजू रेड्डी, म्हातारदेवीच्या सरपंचा संध्या पाटील, म्हतारदेवी ग्रामपंचायत सदस्य प्रिया गोहणे, नकोड्याच्या ग्रामपंचायत सदस्य, ममता मोरे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवा नेते पंकज गुप्ता, बहुजन महिला आघाडी घुग्घूस शहर अध्यक्ष उषा आगदारी, आदिवासी महिला आघाडी शहराध्यक्ष उज्वला उईके, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते ईमरान खान, नितु जैस्वाल, प्रेम गंगाधरे, मुन्ना लोढे, स्वप्निल वाढई, अन्वर सय्यद, राजू नातर आदिंची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेड हि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचली आहे. चंद्रपूरसह घुग्घूस शहरातही संघटनेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहे. कोरोना काळात संघटनेने कौतुकास्पद काम केले. सोबतच नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दिशेनेही आमचे प्रयत्न सुरु आहे. आजवर यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही विविध भागात 80 हून अधिक आयोग शिबिरांचे आयोजन केले आहे. महिलांसाठी मोठे आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा आमचा मानस असल्याचेही ते यावेळी म्हणाले. बदलत्या युगात मोबाईल आणि टिव्हीच्या अतिवापराचा दुष्परिणाम डोळ्यांवर होत आहे. त्यामुळे घुग्घुस येथे हा भव्य नेत्रचिकित्सा शिबिर आणि चष्मे वाटप कार्यक्रम आपण येथे आयोजित केला. या शिबिराला घुग्घूस वासीयांनीही मोठा प्रतिसाद दिला. त्यामूळे पूढेही यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून जनहिताचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केल्या जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

आज पार पडलेल्या आरोग्य शिबिरामध्ये नोंदणी केलेल्या १२०० नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली यातील 900 रुग्णांना सदर शिबिरात निशुल्क चष्मे वितरीत करण्यात आले तर पात्र ठरलेल्या 80 रुग्णांवर सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात मोतीया बिंदुची निशुल्क शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

यावेळी स्मिता कांबळे, यशोधरा पाझारे, गीता बोबडे, माया माडवकर, जनाबाई निमकर, बबिता नागतुरे, विना गुचियात, सुनीता चुने आदी प्रामुख्याने उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here