घुग्घुस शहरात भाजपातर्फे शेतकरी बांधवांचा सत्कार

0
279

घुग्घुस शहरात भाजपातर्फे शेतकरी बांधवांचा सत्कार

बळीराजाच्या मदतीसाठी सदैव तत्पर – विवेक बोढे

घुग्घुस येथील भाजपातर्फे गुरुवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी बैल पोळ्यानिमित्त पोळा मैदानात बैल जोडी घेऊन येणाऱ्या शेतकरी बांधवांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, शेतकरी बांधवांच्या पाठीमागे ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र खंबीरपणे उभे आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त पिक विमा शेतकरी बांधवांना मोफत सेवा केंद्रातून ऑनलाईन काढून देण्यात आला. तसेच शेतकऱ्यांची सर्व कामे मोफत ऑनलाईन करून देण्यात येत आहे.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, ठाणेदार आसिफराजा शेख, संजय तिवारी, किसान आघाडी अध्यक्ष प्रदीप जोगी, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, चिन्नाजी नलभोगा, साजन गोहणे, विनोद चौधरी, अमोल थेरे, बबलू सातपुते, रत्नेश सिंग, राजेश मोरपाका, हसन शेख, प्रेमलाल पारधी, मधुकर मालेकर, अमीना बेगम, गणेश कुटेमाटे, हेमराज बोंबले, तुलसीदास ढवस, उपपोलीस निरीक्षक गौरीशंकर आमटे, सुरेंद्र जोगी, विनोद पिंपलशेंडे, असगर खान, पुंडलिक खनके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here