आजच्या स्मार्ट फोनच्या युगात निरोगी आरोग्याचा दृष्टीने कबड्डी सारखे मैदानी खेळ महत्वाचे -ऍड. वामनराव चटप

0
400

आजच्या स्मार्ट फोनच्या युगात निरोगी आरोग्याचा दृष्टीने कबड्डी सारखे मैदानी खेळ महत्वाचे -ऍड. वामनराव चटप

स्व. प्रभाकरजी दिवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ खुल्या कबड्डी स्पर्धेच उदघाटन संपन्न

 

 

बिबी : आवाळपूर येथे स्व. प्रभाकरजी दिवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ खुल्या कबड्डी स्पर्धेच्छा थरार नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे उदघाट्न माजी आमदार तथा शेतकरी नेते ऍड वामनराव चटप यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष म्हणून स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सभापती नीलकंठ कोरांगे उपस्थित होते, यावेळी आवाळपूरच्या सरपंचा प्रियंका दिवे, उपसरपंच बाळकृष्ण काकडे, ग्रामपंचायत सदस्य विकास दिवे, वैभव दिवे, अमोल गोरे तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. स्पर्धेचा यशस्वीतेची जिम्मेदारी ही फार मोठी जिम्मेदारी असून आयोजकांनी यासाठी काळजी घेण्याचे आवाहन नीलकंठ कोरांगे यांनी आयोजकांना केले.
आजच्या या स्मार्ट फोनच्या युगात विद्यार्थी हे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यांचा कल स्मार्टफोन गेम कडे जास्त आहे. त्यामुळे शारिरीक दृष्ट्या आवश्यक असलेले मैदानी खेळ आज कमी होत आहेत. म्हणून जर तंदुरुस्त रहायचे असेल तर कबड्डी सारखे मैदानी खेळ अतिशय महत्वाचे आहे. आवाळपूर हा गाव नेहमी सांस्कृतिक व खेळाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध आहे. आयोजकांनी नियमित अशा स्पर्धा घेत रहाव्या. आज या स्पर्धेचा माध्यमातून आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सहकारी स्व. प्रभाकर दिवे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देता आली. त्यांचा नावाने हे चषक नेहमी घेत रहा असे मत ऍड वामनराव चटप यांनी उदघाट्न कार्यक्रमात बोलताना मांडले.
तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेत पारितोषिक वितरण कार्यक्रम काल रविवारला पार पडला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक न्यू राजे क्रीडा मंडळ पडसगाव या संघाने तर द्वितीय क्रमांक जय जगन्नाथ बाबा क्रीडा मंडळ कढोली या मंडळाने पटकाविला सर्व विजेत्या संघाला ट्रॉफी आणि बक्षिसे प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक गावाच्या सरपंचा प्रियंका दिवे यांनी केले व संचालन नितेश शेंडे यांनी केले.कबड्डी स्पर्धेचा यशस्वीतेसाठी न्यू साई क्रीडा मंडळाचे सदस्य मंगेश सोयाम,ओम सुर,दिशांत देवगडे,कुणाल धोटे,स्वराज मुंगुल,हिमांशू मांदाले,यश मोरे, लकी धोटे,दीपक सुर,अजय मालेकर,मोहनदास भोयर,प्रशांत दुबे,आदित्य सिडाम,नीरज सिडाम,सारंग सिडाम ,भारत दुतकोर, रीतिक वासेकर,सूरज सोनवणे,राजेश चौधरी आदी सदस्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here