माणिकगड सिमेंट कंपनी मुळे गडचांदूर वासी डस्ट ने त्रस्त

0
509

माणिकगड सिमेंट कंपनी मुळे गडचांदूर वासी डस्ट ने त्रस्त

निवेदने देऊन सुद्धा घेत नाही दखल

साईशांतीनगर वासियांनी काढले निषेध आंदोलन.

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाची “माणिकगड सिमेंट कंपनी” वेगवेगळ्या कारणाणे सतत चर्चेत असते.ही कंपनी ज्या शहरात उभी करून कोट्यावधी रूपये कमावत आहे.नेमकी त्याच शहरातील नागरिकांच्या ही कंपनी जीवावर उठल्याचे सुर उमटत आहे.इतर बाबींकडे दुर्लक्षित केले तरी मुख्यतः डस्ट प्रदूषणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे.सतत सैरावैरा सुटणार्‍या डस्टमुळे शहरवासी कमालीचे त्रस्त असून जीव अक्षरशः धोक्यात आले आहे.डस्टच्या उपाययोजनेसाठी जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळासह संबंधितांकडे वारंवार तक्रारी केल्या.मात्र या बलाढ्य कंपनीपुढे सगळेच हतबल असल्याने कारवाई शून्य आसल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.नागरिक याविषयी जसजश्या तक्रारी करीत आहे,तसतश्या कंपनीकडून डस्टचा वर्षाव पुन्हा जोमाने सुरू आहे.या समस्याने अख्खे शहरवासी त्रस्त असताना शहरातील तथाकथीत समाजसेवक व जनतेचे कैवारी लोकप्रतिनिधी मात्र याविषयी चकार शब्दही काढत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
असे असताना येथील प्रभाग क्रमांक २ साईशांती नगरीच्या रहिवासीयांनी मात्र डस्ट संदर्भात कंपनी विरोधात दंड थोपटले आहे.शासन,प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी याच प्रभागातील भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांच्या नेतृत्वात २१ मार्च रोजी माणिकगड सिमेंट कंपनी विरोधात अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आला.काळे झेंडे फडकवत,काळी पट्टी बांधून साईशांती नगरातून निषेध रॅली काढण्यात आली.यात कंपनीच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी गगनभेदी घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणले होते.साईशांती नगरातील महिला,पुरूष,तरूण,बालगोपालांसह कंपनीच्या डस्ट प्रदूषणामुळे त्रस्त शहरातील बरेचशे नागरिक सदर आंदोलनात स्वखुशीने सहभागी झाले होते.कंपनी समोरील रोड वरील पेट्रोल पंप चौकात रॅलीचे रुपांतर सभेत झाले.उपस्थितांनी कंपनी व जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळा विरोधात तिव्र शब्दात मत व्यक्त केले.सदर आंदोलनात ठिकठिकाणी लावण्यात आलेले निषेध बॅनर नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरले.यानंतर डस्ट प्रदूषणावर निमंत्रण आणले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.आता याविषयी कार घडते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here