पुलाच्या साईटवरील ४०० ब्रास रेतीसाठा चोरीला

0
740

पुलाच्या साईटवरील ४०० ब्रास रेतीसाठा चोरीला

महसूल विभागाचा बुडतोय ‘महसूल’

स्थानिक प्रशासन झोपेतच

गोंडपिपरी (सूरज माडूरवार) : दि. ३ मे सोमवारी प्रसारमाध्यमांनी पुलाच्या बांधकामाकरिता चक्क नदीपात्रातून रेतीची चोरी हा तारड्यातील प्रकार समोर आणला होता.
गोंडपिपरी तालुक्यातील तारडा गावातून पोंभुरणा तालुक्याच्या सीमेला जोडणाऱ्या एका मोठ्या पुलाच्या निर्मितीचे काम शासणाने काम हाती घेतले आहे. सदर पूलाच्या कामासाठी दोन ते तीन यांत्रिक मशीन द्वारे नदीपात्राला उपसून ती रेती नदीच्या तीरावर पुलाच्या साईटवर टाकण्यात आली. अनेक रेती ढिगारे नदीपात्रात उभे होते. त्यांना परवानगी आहे का विचारले असता हा कामाचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले. नदीकाठावर अंदाजे 400 ब्रास रेतीसाठा जमा करण्यात आला. प्रसारमाध्यमांनी जीपीएस फोटो सोमवारी काढले गुरुवारी पाहले असता चक्क ती रेती गायप होती. गोंडपीपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती साठा आहे असं असताना एकही घाटाचा लिलाव झाला नाही. महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने वारेमाप उचल होत होत असल्याने महसूल विभागाच्या महसूल बुडत आहे. यात महसूल विभागाच्या अनेका कर्मचाऱ्यांचे हात ओले होत असल्याची स्थानिकांत चर्चा आहे.
एकीकडे घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही. दुसरीकडे एकाच दिवशी ४०० ब्रास रेती अवैद्य साठवणूक होऊन २ दिवसात गायब होते. त्यामुळे अधिकारी झोपले आहेत काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here