पुरात अडकलेल्या ट्रक चालक व वाहकांसाठी बहिणी आल्या धावून

0
425

पुरात अडकलेल्या ट्रक चालक व वाहकांसाठी बहिणी आल्या धावून

तनिष्का महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन सण केला साजरा

 

राजुरा : तालुक्यासह परिसरात मागील एक आठवड्यापासून सततच्या संततधार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहत आहे. त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला असून मागील चार दिवसांपासून राजुरा-चंद्रपूर मार्ग व बल्लारपूर-सास्ती-राजुरा मार्ग होता. वाहतूक बंद असल्याने अनेक वाहने अडकुन पडली होती. रक्षाबंधन सारखा पवित्र सण असतानाही कित्येक ट्रक चालक व वाहकांना आपल्या बहिणीकडून राखी बांधता आली नाही. ही उणीव राजुरा येथील तनिष्का च्या महिलांनी भरून काढत मागील तीन दिवसांपासून लांबच लांब ट्रकाच्या लागलेल्या रांगा व त्याठिकाणी असलेल्या ट्रक चालक व वाहकांना बहिणीची माया दाखवीत सर्वांना राखी बांधून फळ वाटप केले आहे.

भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, त्यांच्या नात्याचे आणि बंधनाचे धागे अजूनही तितकेच घट्ट असले तरीही आता काही गोष्टींमध्ये बराच फरक पडला आहे. बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्वीकारतो. मात्र पुरामुळे हे पवित्र नात दिवसावर साजरं करता येत नसल्याचे खंत वाहन चालकांना होती. शेवटी स्त्री ही कुणाची ना कुणाची बहीण असल्याने त्या धाग्या मागच्या भावना खूप मोठ्या आहे. या भावना नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तनिष्का महिलांनी ओळखून ट्रक चालक वाहकांच्या पवित्र नात्याची उणीव भरून काढण्याचे काम करीत राजुरा-बामणी मार्गावर उभ्या असलेल्या शेकडो ट्रक चालक व वाहकांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

यावेळी तनिष्का महिला लता ठाकरे, ज्योती ठावरी, मनिषा चटप, वैशाली हिंगाने, दिपाली हिंगाने, सुनिता कुंभारे, पुष्पा उईके, लता कुळमेथे, मिना डांगे, संगिता पाचघरे, हेमा लांजेकर, सुलोचना बोथले सह अन्य महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here