कोरोनाकाळात बेरोजगार झालेले युवक-युवती आम आदमी पार्टी च्या मदतीने बनत आहेत उद्योजक

0
323

कोरोनाकाळात बेरोजगार झालेले युवक-युवती आम आदमी पार्टी च्या मदतीने बनत आहेत उद्योजक

चिमूर विधानसभेत आम आदमी पार्टी च्या ‘मागेल त्याला उद्योग’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

आप चे प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांचा होतकरू तरुणांसाठी अभिनव उपक्रम.

कोरोनाकाळातील परिस्थितीमुळे अनेक युवक युवती बेरोजगार झालेत. व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे आर्थिक घडी विस्कटली गेली त्यामुळे मुंबई पुण्यासारख्या शहरात काम करणारे अनेक युवक युवती बेरोजगार झालेत. याची सर्वात जास्त झड ग्रामीण भागात बसलीय. परिस्थितीने हतबल झालेले अनेक युवक-युवती नैराश्यात गेले. भविष्य अंधकारमय वाटत असतांना वेळेची गरज ओळखून चिमूर विधानसभेत आम आदमी पार्टी चे प्रा. डॉ. अजय पिसे यांच्या नेतृत्वात ‘मागेल त्याला उद्योग’ अभियानाची सुरुवात केली.

मागील तीन महिन्यांपासून चालू असलेल्या या अभियाना अंतर्गत नोंदणी केलेल्या होतकरू युवक युवतींना त्यांच्या घरी जाऊन ग्रामीण भागात कमीत कमी किमतीत चालू होणारे व खात्रीशीर मार्केट असणारया वीस उद्योगांची माहिती देण्यात येत आहे व निवडलेला उद्योग चालू करण्यासाठी घरपोच पूर्ण प्रशिक्षण व मदत करण्यात येते. हे संपूर्ण प्रशिक्षण व मदत ही निशुल्क असून युवकांना उद्योगासाठी प्रेरित करणे हा आम आदमी पार्टी चा मुख्य उद्देश आहे.

आजपावेतो शंभर च्या वर युवक-युवतींनी ‘मागेल त्याला उद्योग’ या उपक्रमांतर्गत लहान-मोठे उद्योग व्यवसाय चालू करण्याची हिम्मत दाखविली आहे. यामध्ये प्रामुख्याने अगरबत्ती व्यवसाय, मशरूम लागवड, गावरान कुक्कुटपालन, शेडी पालन, सोलर उद्योग, डीटेरजंट अंड क्लीनर व्यवसाय, याला प्रामुख्याने पसंती दर्शविली आहे.

या अभियानाअंतर्गत विशाल बारस्कर, सुनील भजभुजे, विलास दिघोरे, शिवाजी बोरकर, निरंजन बोरकर, सविता हजारे, आदित्य पिसे, नरेश बुटके, मंगेश शेन्डे, देवता सूर्यवंशी, दीपक तरारे, मंगेश पंधरे, अनिकेत पिसे असे अनेक शेकडो युवक-युवती ‘नव उद्योजक’ बनत आहेत. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी आप चे त्रिलोक बघमारे, विशाल इंदोरकर, सुशांत इंदोरकर, यशवंत सरदार व अनेक पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here