सतत विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी झटणारे आदर्श शिक्षकी व्यतिमत्व म्हणजे आदरणीय शेंडे सर- सरपंच सचिन बोंडे

0
696

सतत विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी झटणारे आदर्श शिक्षकी व्यतिमत्व म्हणजे आदरणीय शेंडे सर- सरपंच सचिन बोंडे

33 वर्षे अविरत प्रामाणिकपणे शिक्षण क्षेत्रात सेवा देणारे आदर्श शिक्षक दिलीप शेंडे यांची आज सेवानिवृत्ती

(अमोल राऊत ) : आज दिनांक 31 जुलै 2020 रोजी ग्रामपंचायत सांगोडा तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सांगोडा च्या संयुक्त विद्यमानाने मुख्याध्यापक दिलीप नारायण शेंडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सचिनजी बोंडे होते. सत्कारमूर्ती म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप शेंडे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख पंढरीजी मुसळे, उपसरपंच विजय लांडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीणजी घोगरे,माजी सरपंच वामनजी मुसळे,त मु स अध्यक्ष वसंताभाऊ मोहितकर, रवींद्र आस्वले,दादा पाटील धांडे,विठ्ठल गोंडे सर, रत्नाकर बोभाटे सर, सुधाकर वैद्य सर, जि.प. शाळा सांगोडयाचे सहकारी ₹, शिक्षिका सौ. शोभा शेंडे, धांडे सर, टेकाम सर आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील 33 वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या शेंडे सरांनी अनेक अडचणीना तोंड देत आपला शैक्षणिक वारसा जपला. एका साधारण घरण्यातून आलेल्या शेंडे सरांणी 1987 ला चिमूर जवळील मासळ येथून आपल्या शैक्षणिक ज्ञान देण्याच्या प्रवासाला सुरुवात केली. तेव्हा पासून आतापर्यंत म्हणजे 31 जुलै 2020 पर्यंत तो प्रवास गेली 33 वर्षे अविरत चालू होता.
गेल्या 33 वर्षात त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले,अनेकांना त्यांनी मदत केली, मार्गदर्शन केले, त्यांचा सहवासात अनेक तरुण शिक्षक घडले. सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचा चांगला सहभाग होता.
शेंडे सरांचं काम नक्कीच व्याखाणजोगे होते. सकाळी 10 च्या आत शाळेत जाणे. शाळेची वेळ कटाक्षाने पाळणे. सकाळी 10 वाजेपासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत सतत कामात राहणे हा त्यांचा नित्यनियम होता. शालेय रेकॉर्ड मध्ये तर त्यांचा खूप मोठा हातखंडा होता, रेकॉर्ड टॉप टीप ठेवणे,वेळच्या वेळी रेकॉर्ड भरणे, शालेय पोषण आहाराच्या ऑनलाइन,ऑफलाइन नोंदी वेळीच घेणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सभा घेऊन त्यांना विश्वासात घेणे, गावकऱ्यांना विश्वासात घेऊन नवनवीन काम करणे, सांगोडा शाळा ए ग्रेड मध्ये आणणे,शाळेतील सर्व मुलांना आरोच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना उत्तम शालेय पोषण आहार देणें,सर्व वर्ग खोल्याचे पेंटिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध खेळ स्पर्धा, अशी विविध कामे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केली.
साधे राहणीमान साधे विचार मात्र खूपच अनमोल अस व्यक्तिमत्त्व म्हणजे शेंडे सर,कधी कुठल्याही शिक्षकांना त्रास नाही, कधी शांत तर कधी तापट, पण थोडयाच वेळात हसवने. आपुलकी, प्रेम, संबंध जोपासने, असे विविध गुण त्यांचे कडून त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाल्याची माहिती उपस्थित मान्यवर आणि सहकाऱ्यांनी दिली. सेवानिवृत्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी शाळेचे काम केले. दिवसभर काम करून पण त्याच्या चेहऱ्यावर कधीही थकवा जाणवत नव्हता. नेहमी चेहरा प्रसन्न व हसत राहणे हाच त्यांचा स्वभाव.
सतत कामात व्यस्त राहणाऱ्या,चोवीस तास काम करणाऱ्या,नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या,वयोवृद्ध असून सुद्धा सर्वांसोबत मिळून मिसळून राहणाऱ्या या हाडाच्या मुख्याध्यापकला, आदर्श शिक्षकाला आमच्या Impact 24 news चा मानाचा मुजरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here