उषा आगदारी यांची नगरपरिषदेला त्वरित नाली बांधकाम करण्याची मागणी

0
419

उषा आगदारी यांची नगरपरिषदेला त्वरित नाली बांधकाम करण्याची मागणी

घुग्घुस, १० मार्च : शहरातील वॉर्ड क्रमांक १० येथील नालीचे त्वरित बांधकाम करण्याची मागणी उषा आगदारी यांनी आज नगरपरिषदेला निवेदनातून मागणी केली.
वॉर्ड क्र. १० येथील रहिवासी कामिनी मारोती वैद्य यांच्या घरामागील नालीत नेहमी घाण साचलेली असते. यामुळे जवळील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घाणीमुळे विविध आजारास निमंत्रण मिळत आहे. यामुळे मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधून लवकरात लवकर बंदिस्त नालीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी यंग चांदा बिग्रेड व बहुजन महिला शहर अध्यक्षा उषा आगदारी, कामिनी वैद्य, वंदना क्षीरसागर, चंदा दुर्गे, भारती सोदारी, कामिनी देशकर, रुंदा कोंडे, ज्योतीताई मालेकर, ललिता कुंबरे, राधाबाई गोगला, ममता गोगला, अरुणा गोगला, सविता उदिरवांडे, अनिता मुंडे यासह परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here