राजस्थान (जालोर) प्रकरणाच्या निषेधार्थ “भिम आर्मी” चा मुक मोर्चा

0
394

राजस्थान (जालोर) प्रकरणाच्या निषेधार्थ “भिम आर्मी” चा मुक मोर्चा
चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन
इंद्रकुमार मेघवाल अमानवी मारहाण व मृत्यू प्रकरण

 

राज जुनघरे
चंद्रपूर :– राजस्थान, जालोर येथील सुराणा गावातील 9 वर्षीय इंद्रकुमार मेघवाल नामक चिमुकल्यास छेलसिंग नामक शिक्षकाकडून झालेल्या अमानवी मारहाण व मृत्यु प्रकरणाच्या विरोधात भीम आर्मी (भारत एकता मिशन) जिल्हा चंद्रपूर या सामाजिक संघटने कडून दिनांक 18 आगस्ट रोजी मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतड्यापासून मूक मोर्चा जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत पायदळ मार्च करीत निघाला. व जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन दिले.

प्रासंगीक भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र रायपुरे यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत मत मांडले कि, ” भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वा वर आधारित सामाजिक, राजकीय व आर्थिक समानतेशी संलग्न अशी राज्यघटना भारतास देऊ केली असताना एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव साजरा होत असताना जालोर,सुराणा गाव, राजस्थान येथील इंद्रकुमार मेघवाल या 9 वर्षीय चिमुकल्यावर केवळ शिक्षकांच्या माठातून पाणी पिल्यामुळे अमानवीय मारहान करण्यात आली. त्या मारहाणीत बालकाची कानाची नस फाटल्या जाते, एक हाथ आणि एक पाय निकामी होतो आणि शेवटी त्याच्या जीवनाशी असलेली त्याची झुंज संपते.

मानवजातीला विशेषतहा पालक वर्गाला व समाजमन सुन्न करणारी आणि शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी आहे. आज स्वातंत्र्याचे 75 वर्षे लोटली तरी या देशातील शोषित, पिडित जनता काय मनुवादी विचारसरणीचे लोक या रूढीवादी जाती प्रथेच्या पारंपरिक परंपरे पासून मुक्त झालेले आहेत? असा प्रश्नचिन्ह निर्माण केला आणि खालील मांगण्या केल्यात.

1)मारेकरी छेलसिहं यास फाशी ची शिक्षा करण्यात यावी.
2)पीडित परिवारास एक कोटी रुपये निधी मंजूर करुन द्यावा.
3)परिवारातील एका सदस्याला शासकीय नौकरी मध्ये सामावून घ्यावे.
4)कार्यवाही करण्यास दिरंगाई करणाऱ्या पुलिसांना बडतर्फ करण्यात यावे.
अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी महानगर प्रमुख ऍड. प्रशांत रामटेके यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत कलम 15 चे महत्व सांगितले. घडलेला प्रकार हा कलम 15 चे उल्लंघन आहे. तेव्हा वरील सर्व मांगण्याची पूर्तता त्वरित करण्यात यावी अशी मांगणी केली.

महाराष्ट्र महासचिव शंकर मुन यांनी सुद्धा या घटनेचा निषेध करीत भाई चंद्रशेखर यांच्या आदेश प्राप्त होताच संपूर्ण भारतात तीव्र आंदोलने केल्या जातील असे सांगितले.

प्रसंगिक महाराष्ट्र महासचिव शंकर मुन, जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र रायपुरे,महानगर प्रमुख ऍड. प्रशांत रामटेके,उप जिल्हा प्रमुख सुरज उपरे,जिल्हा सचिव राज जुनघरे,जिल्हा संघटक राजू सोदारी, जिल्हा महिला संघटक विशाखा ताई आमटे,जिल्हा प्रवक्ता विजय गेडाम,बल्लारपूर गोंडपिपरी प्रभारी प्रमोद कातकर , तालुका संघटक राहुल बांबोडे, बल्लारपूर तालुका उपाध्यक्ष अनिल वनकर,भद्रावती तालुका उपप्रमुख अन्वर अली, महिला तालुका प्रमुख अंजली पाटील,महिला प्रवक्ता संस्कृती मुन,महानगर सचिव प्रणित तोडे,डॉ. उज्वल देवगडे, मिलिंद शेंडे, रमाकांत मेश्राम, चोरखिडकी प्रमुख मंगेश रंगारी, कोठारी प्रमुख युगल तोडे ,रयतवारी प्रमुख रेखाताई धोटे, राहुल नगराडे,ऍड. चैतन्य खरतड, स्वप्निल देठे, सोनल भगत, संघपाल मुंढे,कृतिका आमटे, संघप्रकाश ठमके, ब्रिजेश तामगडे, अंश रामटेके, उज्वल आमटे, सोनू देठे, प्रणाली भगत, बादल गावंडे , बाडू बेसेकर , अनिकेत भागवत , पराग शेंडे, नितेश मून , नितीन रामटेके , मयूर ,सुरज पडोळे, स्वप्नील देव, रमेश दुर्योधन,धम्मा उराडे, कुणाल डोंगरे तसेच शेकडो सैनिक हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here